Republic Day 2022 : Video - कडक सॅल्यूट! मायनस 40 डिग्री तापमान अन् 15000 फूट उंचीवर जवानांनी फडकवला तिरंगा 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 12:04 PM2022-01-26T12:04:14+5:302022-01-26T12:14:05+5:30

Republic Day 2022 And Indo-Tibetan Border Police : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयटीबीपीच्या जवानांनी लडाखमध्ये 15 हजार फूट उंचीवर उणे 40 डिग्री तापमानात तिरंगा फडकावला आणि राष्ट्रगीत गायलं आहे.

Indo-Tibetan Border Police personnel celebrate RepublicDay at 15,000 feet altitude in 40 degree Celsius temperature in Ladakh | Republic Day 2022 : Video - कडक सॅल्यूट! मायनस 40 डिग्री तापमान अन् 15000 फूट उंचीवर जवानांनी फडकवला तिरंगा 

Republic Day 2022 : Video - कडक सॅल्यूट! मायनस 40 डिग्री तापमान अन् 15000 फूट उंचीवर जवानांनी फडकवला तिरंगा 

googlenewsNext

नवी दिल्ली - आज संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा केला जात आहे. याच दरम्यान तब्बल 15000 फूट उंचीवर मायनस 40 डिग्री तापमानात जवानांनी तिरंगा फडकवला आणि भारत माता की जय म्हणत भारतीय जवानांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयटीबीपीच्या (Indo-Tibetan Border Police ) जवानांनी लडाखमध्ये 15 हजार फूट उंचीवर उणे 40 डिग्री तापमानात तिरंगा फडकावला आणि राष्ट्रगीत गायलं आहे.

हिमाचल प्रदेशात 16 हजार फूट उंचीवर तिरंगा फडकावत इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस (ITBP) जवानांनी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला. प्रसंग कोणताही असो, सीमेवर आपल्या संरक्षणासाठी सतत उभ्या असलेल्या आपल्या जवानांचा सार्थ अभिमान वाटतो. आयटीबीपीने ध्वजारोहणाचे फोटो शेअर केले आहेत. देशात 73 व्या प्रजासत्ताक दिनी उत्साहाचे वातावरण आहे. राजपथावर परेडला सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते त्रिपुरातील आगरतळा येथे ध्वजारोहण करण्यात आलं. तर महाराष्ट्रात वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.

Web Title: Indo-Tibetan Border Police personnel celebrate RepublicDay at 15,000 feet altitude in 40 degree Celsius temperature in Ladakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.