Indira Gandhi Birth Anniversary : नरेंद्र मोदी, राहुल गांधी अन् सोनिया गांधींनी इंदिराजींना वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 09:55 IST2018-11-19T09:44:34+5:302018-11-19T09:55:29+5:30

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज 101 वी जयंती आहे. जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधींसह अनेक मान्यवरांनी इंदिरा गांधींना श्रद्धांजली वाहिली आहे. 

Indira Gandhi 101st Birth Anniversary: PM Modi pays tribute to India's former PM; Rahul, Sonia, Manmohan offer floral homage | Indira Gandhi Birth Anniversary : नरेंद्र मोदी, राहुल गांधी अन् सोनिया गांधींनी इंदिराजींना वाहिली श्रद्धांजली

Indira Gandhi Birth Anniversary : नरेंद्र मोदी, राहुल गांधी अन् सोनिया गांधींनी इंदिराजींना वाहिली श्रद्धांजली

ठळक मुद्देभारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज 101 वी जयंती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधींसह अनेक मान्यवरांनी इंदिरा गांधींना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर इंदिरा गांधींना श्रद्धांजली वाहिली आहे.

नवी दिल्ली - भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज 101 वी जयंती आहे. जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधींसह अनेक मान्यवरांनी इंदिरा गांधींना श्रद्धांजली वाहिली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर इंदिरा गांधींना श्रद्धांजली वाहिली आहे. इंदिरा गांधींच्या समाधीस्थळी जाऊन राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी आदरांजली वाहिली. इंदिरा गांधींच्या जयंतीनिमित्त काँग्रेसच्यावतीने देशभरात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. 'आयर्न लेडी' म्हणून इंदिरा गांधींचा जगभरात लौकिक आहे. आणीबाणी, ऑपरेशन ब्लू स्टार यांसारखे धाडसी निर्णय इंदिरा गांधींच्याच काळात भारताने घेतले होते. त्यामुळे अनेक कठोर प्रसंगांना इंदिरा गांधींना सामोरे जावे लागले होते. मात्र, इंदिराजींच्या याच धाडसी बाण्याचे कौतुक अनेक वर्षं होत आहे.


Indira Gandhi Birth Anniversary - ...अन् इंदिरा गांधींना 'दुर्गा' हे विशेषण जोडलं गेलं!


इंदिरा गांधी या भारताच्या एक सशक्त महिला पंतप्रधान राहिल्या आहेत. ज्यांच्या अढळ निर्णयांनी जगाला भारतापुढे झुकायला भाग पाडलं होतं. त्यांच्या कणखर भूमिका अन् कठोर निर्णयक्षमतेमुळेच बांगलादेश हा स्वतंत्र देश अस्तित्वात आला. भारतानं त्यांच्या कार्यकाळात अवकाश क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. पंजाबमध्ये उफाळून आलेला हिंसाचार थोपवण्यातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. तसेच त्यांच्या कार्यकाळात भारत आण्विक संपन्न देश झाला. त्यांच्या कठोर निर्णय घेण्याच्या भूमिकेला विरोधकांनी नेहमीच विरोध केला. परंतु त्या कोणालाही न जुमानता देशाहिताचे निर्णय घेत राहिल्या. त्यामुळेच त्यांना 'आयर्न लेडी' म्हटलं जातं.

Web Title: Indira Gandhi 101st Birth Anniversary: PM Modi pays tribute to India's former PM; Rahul, Sonia, Manmohan offer floral homage