इंडिगोला दणका; ४ फ्लाइट ऑपरेशन इन्स्पेक्टर निलंबित, सीईओ पीटर एल्बर्स यांची सलग दुसऱ्या दिवशी डीजीसीएने चौकशी केली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 06:10 IST2025-12-13T06:08:04+5:302025-12-13T06:10:55+5:30
पायलट, डिस्पॅचर, केबिन क्रू कर्मचाऱ्यांची तपासणी, हवाई वाहतूक सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन होते की नाही यावर लक्ष ठेवणे, प्रशिक्षण, फ्लाइट स्टँडर्ड, अपघात प्रतिबंधक उपायांचे निरीक्षण आदी कामे एफओआय करत असतात.

इंडिगोला दणका; ४ फ्लाइट ऑपरेशन इन्स्पेक्टर निलंबित, सीईओ पीटर एल्बर्स यांची सलग दुसऱ्या दिवशी डीजीसीएने चौकशी केली
नवी दिल्ली / मुंबई : गेल्या काही दिवसांपासून इंडिगोची विमानसेवा कोलमडली व त्यामुळे हजारो प्रवाशांना अतोनात हाल सहन करावे लागले. या घटनेमुळे नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) चार फ्लाइट ऑपरेशन्स इन्स्पेक्टरना (एफओआय) शुक्रवारी निलंबित केले.
पायलट, डिस्पॅचर, केबिन क्रू कर्मचाऱ्यांची तपासणी, हवाई वाहतूक सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन होते की नाही यावर लक्ष ठेवणे, प्रशिक्षण, फ्लाइट स्टँडर्ड, अपघात प्रतिबंधक उपायांचे निरीक्षण आदी कामे एफओआय करत असतात. दरम्यान, इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांची सलग दुसऱ्या दिवशी डीजीसीएने चौकशी केली.
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
इंडिगो कारभाराची सीसीआयकडून तपासणी
इंडिगोने नियमांचे उल्लंघन केले का, याची चौकशी कमिशन ऑफ इंडिया (सीसीआय) करणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. सीसीआयने स्वत:हून दखल घेऊन ही कारवाई सुरू केली आहे.
तर दुसरीकडे इंडिगोनेही कारणमीमांसा करण्यासाठी शुक्रवारी कॅप्टन जॉन इल्सन यांच्या नेतृत्त्वाखाली स्वतंत्र हवाई वाहतूक तज्ज्ञांची नियुक्ती केली आहे.