शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक असमतोल ! देशातील 73 टक्के संपत्ती फक्त 1 टक्के श्रीमंतांकडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2018 11:50 IST

देशातली 73 टक्के संपत्ती फक्त 1 टक्के श्रीमंतांकडे असल्याचं अहवालातून उघडकीस झालं आहे. भारतातील तीन चतुर्थांश संपत्ती ही फक्त एक टक्के लोकांकडे एकवटल्याचा निष्कर्ष या अहवालातून काढण्यात आला आहे.

नवी दिल्ली - देशातली 73 टक्के संपत्ती फक्त 1 टक्के श्रीमंतांकडे असल्याचं अहवालातून उघडकीस झालं आहे. भारतातील तीन चतुर्थांश संपत्ती ही फक्त एक टक्के लोकांकडे एकवटल्याचा निष्कर्ष या अहवालातून काढण्यात आला आहे. एकीकडे गेल्या वर्षी भारताला नवे 17 अब्जाधीश मिळाले असले तरी दुसरीकडे अर्ध्याहून जास्त लोकसंख्या असलेल्या भारतात फक्त एक टक्के लोकांकडे 73 टक्के संपत्ती आहे. त्यामुळे श्रीमंत आणखी श्रीमंत होत चाललेत, तर गरीब आणखी गरिबीकडे ओढले जातायत. या दोन्ही वर्गातल्या दरीमुळे भारताचा आर्थिक समतोल बिघडला आहे.'ऑक्सफेम' या संस्थेच्या 'रिवॉर्ड वर्क, नॉट वेल्थ' या अहवालातून हे स्पष्ट करण्यात आले आहे. स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये होऊ घातलेल्या विश्व आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीच्या पार्श्वभूमीवर ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. 37 टक्के अब्जाधीशांना वारसाहक्काने संपत्ती लाभली आहे. अब्जाधीशांकडच्या एकूण संपत्तीपैकी 51 टक्के रक्कम 'या' (वारसाहक्काने अब्जाधीश झालेल्या 37 टक्के) श्रीमंतांकडे आहे. देशातील एकूण लोकसंख्येपैकी 73 टक्के संपत्ती ही फक्त 1 टक्के श्रीमंतांच्या भोवती केंद्रित आहे. तर दुसरीकडे लोकसंख्येच्या 50 टक्के असलेल्या गरिबांची संपत्ती फक्त टक्क्यानं वाढली.महिला अब्जाधीशांची संख्या फक्त 4 टक्क्यांच्या घरात असून, त्यातील तिघींना वारसाहक्काने संपत्ती लाभली आहे. 2018 ते 2022 या कालावधीत देशात 70 लक्षाधीश होतील, असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. 101 अब्जाधीशांपैकी 51 जणांनी वयाची 65 वर्षं पूर्ण केली आहेत. त्यांच्याजवळ एकूण 10 हजार 544 अब्ज रुपये एवढी संपत्ती आहे. येत्या 20 वर्षांत ही रक्कम त्यांच्याकडे वारसांकडे गेल्यास त्यांना 30 टक्के दराने वारसा कर (inheritance tax) लावला जाईल. या माध्यमातून सरकारला 3 हजार 176 अब्ज रुपयांचा फायदा मिळेल. एवढी रक्कम आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी आणि स्वच्छता, नागरी विकास विभागांत खर्च करण्यासाठी फायदेशीर ठरेल. 

टॅग्स :Taxकर