कुलभूषणना भेटण्याची भारताला परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 06:30 IST2019-07-20T06:30:47+5:302019-07-20T06:30:55+5:30
हेरगिरी प्रकरणात फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेले भारतीय अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने अखेर भारतीय अधिकारी आणि मुत्सद्दीना भेटण्याची परवानगी दिली.

कुलभूषणना भेटण्याची भारताला परवानगी
नवी दिल्ली : हेरगिरी प्रकरणात फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेले भारतीय अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने अखेर भारतीय अधिकारी आणि मुत्सद्दीना भेटण्याची परवानगी दिली. हेग मधील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी दिलेल्या दणक्यानंतर पाकिस्तान अखेर नरमल्याचे यातून सिद्ध झाले आहे.
कमांडर कुलभूषण यांना हिएन्ना करारानुसार त्यांच्या अधिकारांची माहिती देण्यात आली आहे. हेगमधील न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी पाकने करावी, असे भारताने बुधवारी म्हटले होते.