शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

भारत बनणार वैद्यकीय कचऱ्याचे आगार? 2020 पर्यंत रोज 775 टन कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 02:29 IST

भारतात २०२२ पर्यंत रोज ७७५.५ टन वैद्यकीय कचरा निर्माण होण्याची भीती असल्याचा इशारा अ‍ॅसोचेम आणि व्हेलॉसिटी या संस्थांनी सर्वेक्षणाअंती दिला आहे. प्रभावी व सुरक्षित कचरा व्यवस्थापनासाठी कडक देखरेख ठेवण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत यात व्यक्त करण्यात आले आहे.

नवी दिल्ली : भारतात २०२२ पर्यंत रोज ७७५.५ टन वैद्यकीय कचरा निर्माण होण्याची भीती असल्याचा इशारा अ‍ॅसोचेम आणि व्हेलॉसिटी या संस्थांनी सर्वेक्षणाअंती दिला आहे. प्रभावी व सुरक्षित कचरा व्यवस्थापनासाठी कडक देखरेख ठेवण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत यात व्यक्त करण्यात आले आहे.भारतीय औद्योगिक क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारी अ‍ॅसोचेम आणि व्हेलॉसिटी या संस्थांच्या अहवालानुसार दरवर्षी वैद्यकीय कचरा उत्सर्जित होण्याच्या प्रमाणात ७ टक्के वाढ होण्याची शक्यताही आहे. सध्या भारतात दरदिवशी ५५०.९ टन वैद्यकीय कचरा निर्माण होत आहे.प्रदूषणमुक्त आरोग्यासाठी प्रभावीपणे काटेकोरपणे कचºयाचे व्यवस्थापन करणे जरुरी असल्याचे अहवालात नमूद केले आहे.कचºयाचे सुरक्षित आणि प्रभावीपणे व्यवस्थापन करणे, कायद्याने जरुरी आहेच. ही सामाजिक जबाबदारीही आहे. गंभीर्य, प्रोत्साहन व जागरूकतेचा अभाव तसेच खर्च अशा कारणांमुळे जैव-वैद्यकीय कचºयाचे व्यवस्थापन करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. भारतात २०२५ पर्यंत कचरा व्यवस्थापनाची बाजारपेठ १३६.२० कोटी अमेरिकी डॉलरवर जाण्याची शक्यता आहे, असे दिल्ली सरकारच्या आरोग्यसेवा विभागाचे महासंचालक डॉ. कृती भूषण यांनी अहवाल मांडताना सांगितले.वैद्यकीय कचरा व्यवस्थापन योग्यप्रकारे न झाल्यास सार्वजनिक आरोग्य धोक्यात येऊ शकते. जल, वायू व माती प्रदूषणाचाही विकसनशील देशांनी गांभीर्याने विचार करून त्या दृष्टीने पावले उचलण्याची गरज आहे.तेव्हा कचरा आणि त्यापासून सार्वजनिक आरोग्यावर होणाºया परिणामांबाबत लोकांत जागरूकता निर्माण करण्याची आणि योग्य प्रकारे कचºयाची वेळीच विल्हेवाट लावण्याची गरज आहे. २०२० पर्यंत रोज ७७५ टन कचराया आजारांचा फैलाव होईलकच-याच्या तकलादू व्यवस्थापनामुळे जल, वायू आणि मृदा प्रदूषण वाढू शकते. तसेच हिवताप, मुदतीचा ताप, पटकी, यकृतदाह यासारख्या रोगांचा प्रसार करणाºया विषाणूंचा फैलाव होऊ शकतो.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल