शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील सर्वात मोठ्या रस्ते आणि रेल्वेपुलाचे पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2018 13:02 IST

हा पूल आसासमधील दिब्रुगड आणि अरुणाचल प्रदेशातील पासीघाट यांना जोडतो. या पुलामुळे चीन सीमेजवळ तैनात असणाऱ्या भारतीय लष्कराला मोठा फायदा होणार आहे.

बोगीबील (आसाम)- भारतातील सर्वात मोठ्या रस्ता आणि रेल्वेपुलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. हा पूल आसासमधील दिब्रुगड आणि अरुणाचल प्रदेशातील पासीघाट यांना जोडतो. या पुलामुळे चीन सीमेजवळ तैनात असणाऱ्या भारतीय लष्कराला मोठा फायदा होणार आहे.या पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून जुलै महिन्यामध्ये सर्व काम पूर्ण होईल. या 4.94 किमी लांबीच्या पुलाचे आता केवळ विद्युतीकरण आणि सिग्नलिंगचे काम होणे बाकी आहे. यावर्षाच्या आखेरीस या पुलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. यापुलाच्या वरच्या भागात रस्त्याच्या तीन मार्गिका आहेत तर खालच्या बाजूस रेल्वेचे दोन मार्ग आहेत.ब्रह्मपुत्रेवर बांधला जाणारा हा पुल तिच्या प्रवाहापासून 32 मी उंचीवर आहे. स्वीडन आणि डेन्मार्क यांना जोडणाऱ्या पुलाप्रमाणे याची रचना आहे. चीनच्या सीमेवर तैनात असणाऱ्या लष्करी फौजांना तेजपूर येथून पाठविल्या जाणाऱ्या साहित्य़ाची वाहतूक आता कमीत कमी वेळात होणार असून याचा अरुणाचल प्रदेश राज्याला मोठा फायदा होणार आहे.आतापर्यंत आसाम आणि अरुणाचल प्रदेश यांना जोगीघोपास हा बोंगाईगॉव जिल्ह्यातील पूल, गुवाहाटी जवळचा सराइंघाट पूल आणि कोलिया भोमोरा हे पूल जोडत असत. त्यामुळे ब्रह्मपुत्रा ओलांडून माल अरुणाचलप्रदेशला जाण्यासाठी 600 किमी प्रवास करावा लागत असे. फेरीबोटीने ब्रह्मपुत्रा ओलांडायची झाल्यास जड सामानाची वाहतूक करता येत नसे तसेच मे पासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत पावसाळ्यामुळे वाहतूक करता येत नाही.

टॅग्स :AssamआसामArunachal Pradeshअरुणाचल प्रदेशriverनदीIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानchinaचीनBorderसीमारेषा