शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

भारताचा इस्त्रायलबरोबरचा क्षेपणास्त्र खरेदी करार फिस्कटला, पाकिस्तानकडे जास्त रेंजची रणगाडा विरोधी क्षेपणास्त्रे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2017 1:21 PM

भारताने इस्त्रायलसोबत केलेल्या क्षेपणास्त्र खरेदीच्या करारातून माघार घेतली आहे. दोन्ही देशांमध्ये 50 कोटी अमेरिकन डॉलर्सचा खरेदी करार झाला होता.

ठळक मुद्दे 1,600 स्पाइक रणगाडे विरोधी क्षेपणास्त्राचा करार महत्वाच्या टप्प्यावर पोहोचलेला असताना भारताने या करारातून अंग काढून घेतले. ‘डाँगफेंग-४१’ (डीएफ-४१) हे अतिप्रगत आंतरखंडीय बॅलेस्टिक आण्विक क्षेपणास्त्र पुढील वर्षाच्या सुरुवातीस चिनी लष्कराच्या सक्रिय सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली - भारताने इस्त्रायलसोबत केलेल्या क्षेपणास्त्र खरेदीच्या करारातून माघार घेतली आहे. दोन्ही देशांमध्ये 50 कोटी अमेरिकन डॉलर्सचा खरेदी करार झाला होता. भारताने या करारातून अंग काढून घेतल्याने लष्कराच्या आधुनिकीकरणाच्या मोहिमेला झटका बसला आहे. संरक्षण मंत्रालय डीआरडीओकडे स्वदेशी बनावटीच्या रणगाडा विरोधी क्षेपणास्त्रांच्या निर्मितीची जबाबदारी सोपवणार आहे.  

भारताच्या तुलनेत पाकिस्तानकडे जास्त मारक क्षमतेची रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र आहेत. पाकिस्तानकडे त्यांच्या इन्फॅन्ट्री सैनिकांसाठी रणगाडा विरोधी पोर्टेबल क्षेपणास्त्रे आहेत. भारतीय रणगाडे तीन ते चार किलोमीटर अंतरावर असताना तसेच बंकर्सना पाकिस्तानी क्षेपणास्त्रे सहज लक्ष्य करु शकतात. 

भारताकडे असलेल्या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रांची रेंज फक्त दोन किलोमीटर आहे. एनडीटीव्ही खबरने लष्करातील सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली.  रणगाडा विरोधी स्पाइक क्षेपणास्त्राचा करार महत्वाच्या टप्प्यावर पोहोचलेला असताना भारताने या करारातून अंग काढून घेतले. भारताने स्वदेशी बनावटीच्या शस्त्रास्त्र निर्मितीवर भर दिला आहे. भारत जी क्षेपणास्त्र इस्त्रायलकडून विकत घेणार होता. तशाच क्षेपणास्त्रांची देशांतर्गत निर्मिती करायची आहे. जेणेकरुन शस्त्रास्त्रांची आयात कमी होईल.  

स्ट्रॅटजिक पार्टनरशिप धोरणातंर्गत मेक इन इंडिया अंतर्गत शस्त्रास्त्र निर्मितीला भारत सरकारने प्राधान्य दिले आहे. स्पाइक क्षेपणास्त्र डागल्यानंतर ते आपणहून टार्गेटचा पाठलाग करते. इस्त्रायलच्या राफेल अॅडवान्स डिफेंस सिस्टिम्सने स्पाइकची निर्मिती केली आहे. पाकिस्तानी सैन्याकडे चिनी बनावटीचे एचजे-8 क्षेपणास्त्र आहे. भारताकडच्या क्षेपणास्त्राच्या तुलनेत एचजे-8 ची मारकक्षमता दुप्पट आहे. पाकिस्तानकडे अमेरिकन बनावटीची TOW क्षेपणास्त्र सुद्धा आहे. एचजे-8 पेक्षा या क्षेपणास्त्राची ताकत जास्त आहे.  

संपूर्ण जग येईल चीनच्या नव्या अण्वस्त्राच्या टप्प्यातजगात कुठेही असलेल्या लक्ष्याचा अचूक वेध घेऊ शकणारे ‘डाँगफेंग-४१’ (डीएफ-४१) हे अतिप्रगत आंतरखंडीय बॅलेस्टिक आण्विक क्षेपणास्त्र पुढील वर्षाच्या सुरुवातीस चिनी लष्कराच्या सक्रिय सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. चीनने हे क्षेपणास्त्र विकसित करण्यास सन २०१२मध्ये सुरुवात केल्यापासून या महिन्याच्या सुरुवातीस देशाच्या पश्चिमेकडील वाळवंटी प्रदेशात त्याची आठवी चाचणी घेण्यात आली, असे ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ दैनिकाने म्हटले आहे. सरकारी ‘ग्लोबल टाइम्स’च्या बातमीनुसार हे क्षेपणास्त्र पीपल्स लिबरेशन आर्मीच्या ‘रॉकेट फोर्स’ या क्षेपणास्त्र दलात सन २०१८च्या पूर्वार्धात दाखल होण्याची शक्यता आहे. काही तज्ज्ञांच्या मते ‘डीएफ-४१’ कदाचित याआधीच लष्करात दाखल होऊन ते अधिक अचूक करण्यासाठी त्याच्या चाचण्या घेतल्या जात असाव्यात.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान