भारताचा वृद्धीदर जी-२० देशांत राहणार सर्वाधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 06:22 IST2025-04-02T06:22:09+5:302025-04-02T06:22:30+5:30

India's Growth Rate: वित्त वर्ष २०२५-२६ मध्ये भारताचा वृद्धीदर ६.५ टक्के राहील, असा अंदाज मूडीज रेटिंग्जने मंगळवारी जारी केलेल्या अहवालात व्यक्त केला आहे. हा वृद्धीदर जी-२० देशांत सर्वाधिक आहे.

India's growth rate will be the highest among G20 countries | भारताचा वृद्धीदर जी-२० देशांत राहणार सर्वाधिक

भारताचा वृद्धीदर जी-२० देशांत राहणार सर्वाधिक

नवी दिल्ली - वित्त वर्ष २०२५-२६ मध्ये भारताचा वृद्धीदर ६.५ टक्के राहील, असा अंदाज मूडीज रेटिंग्जने मंगळवारी जारी केलेल्या अहवालात व्यक्त केला आहे. हा वृद्धीदर जी-२० देशांत सर्वाधिक आहे.

मूडीजने म्हटले की, कर उपाय आणि निरंतर (मौद्रिक) सहजता यामुळे भारताचा वृद्धीदर जी-२० देशांत सर्वाधिक राहील. मात्र, तो २०२४-२५ च्या ६.७ टक्के वृद्धीदरापेक्षा थोडासा कमी आहे. भारताचा महागाईचा सरासरी दर ४.५ टक्के राहू शकेल. आदल्या वित्त वर्षाच्या ४.९ टक्क्यांच्या तुलनेत तो कमी आहे.
मूडीजने म्हटले की, अमेरिकी धोरणांतील अनिश्चिततेमुळे भांडवल काढून घेण्याची जोखीम वाढेल. मात्र, भारत आणि ब्राझीलसारखे देश देशांतर्गत अर्थव्यवस्थेच्या बळावर त्यावर मात करतील.

Web Title: India's growth rate will be the highest among G20 countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.