भारताचा GDP ८.५ टक्क्यांनी वाढणार - आर्थिक पाहणी अहवाल सादर

By Admin | Updated: February 27, 2015 12:27 IST2015-02-27T12:24:16+5:302015-02-27T12:27:50+5:30

पुढील वर्षी देशाचा जीडीपी ८.५ टक्क्यांपर्यंत वेगाने वाढू शकेल तसेच पुढील काही वर्षांत डबल डिजिट म्हणजे १० टक्क्यांपेक्षा जास्त वेगाने देशाची आर्थिक वाढ होईल

India's GDP to grow by 8.5% - Economic Survey Report | भारताचा GDP ८.५ टक्क्यांनी वाढणार - आर्थिक पाहणी अहवाल सादर

भारताचा GDP ८.५ टक्क्यांनी वाढणार - आर्थिक पाहणी अहवाल सादर

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - पुढील वर्षी देशाचा जीडीपी ८.५ टक्क्यांपर्यंत वेगाने वाढू शकेल तसेच पुढील काही वर्षांत डबल डिजिट म्हणजे १० टक्क्यांपेक्षा जास्त वेगाने देशाची आर्थिक वाढ होईल असे भाकित आर्थिक पाहणी अहवालात वर्तवण्यात आले असून उद्या सादर होणारे बजेट देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी आश्वासक असेल असा अंदाज आहे.
विदेशी भांडवलासाठी अत्यावस्यक असलेले वित्तीय तुटीचे लक्ष्य साध्य होईल असेही आर्थिक पाहणी अहवाल सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सांगितले. बँकिंग, विमा, संरक्षण अशा अनेक क्षेत्रांमध्ये ज्या आर्थिक सुधारणांची देशाला अपेक्षा आहे त्या या बजेटच्या माध्यमातून साध्य करता येतील असा विश्वास आर्थिक पाहणी अहवालातून समोर आला आहे. याबरोबरच जीएसटी सुधारणा किंवा गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स प्रणाली लागू होण्याची आशा बळावली असून त्यामुळे उद्योग क्षेत्राला चालना मिळेल. आर्थिक पाहणी अहवालाची चांगली दखल शेअर बाजाराने घेती आणि या अहवाल सादरीकरणानंतर सेन्सेक्सने २५० तर निफ्टी ८२ अंकांनी वधारला.
महागाईचा सध्या घसरलेला दर खालीच राहील असा विश्वास व्यक्त करण्यात आला असून त्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारात घसरलेल्या इंधनाच्य किमती व सरकारचे धोरण कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.
रेल्वे अर्थसंकल्पातील गुंतवणुकीच्या प्रोत्साहनामुळे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होईल, रोजगार निर्माण होईल आणि त्याचा फायदा जीडीपी वाढीसाठी होईल असेही आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: India's GDP to grow by 8.5% - Economic Survey Report