शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कसे असेल बडोद्यातील रेल्वे विद्यापीठ? पुढच्या महिन्यापासून होणार सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 12:55 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या संकल्पनेनुसार या विद्यापिठाची स्थापना करण्यात आली असून पुढील महिन्यामध्ये विद्यापिठाचे अभ्यासक्रम सुरु होतील.

नवी दिल्ली- भारतातील पहिले रेल्वे विद्यापीठ गुजरातमधील बडोदा येथे सुरु होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या संकल्पनेनुसार या विद्यापिठाची स्थापना करण्यात आली असून पुढील महिन्यामध्ये विद्यापिठाचे अभ्यासक्रम सुरु होतील.बडोद्याच्या या रेल्वे विद्यापिठामध्ये पदवीचे दोन अभ्यासक्रम असून पहिल्या वर्षासाठी 103 मुलांची निवड करण्यात आली. शिक्षक दिन म्हणजे 5 सप्टेंबर रोजी या अभ्यासक्रमांचे वर्ग सुरु होणार आहेत. यामध्ये 17 मुलींचा समावेश असून त्यांच्यासाठी वेगळ्या वसतीगृहाची निर्मिती करण्यात आली आहे. बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन इन ट्रान्स्पोर्ट मॅनेजमेंट आणि बॅचलर ऑफ सायन्स इन ट्रान्स्पोर्ट टेक्नोलजी असे दोन अभ्यासक्रम सुरु होत आहेत. 4 सप्टेंबर रोजी विद्यापिठात उद्घाटन कार्यक्रम होईल व दुसऱ्या दिवसापासून विद्यार्थ्यांचे वर्ग सुरु होतील.रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्वनी लोहानी या विद्यापिठाचे कुलगुरू असतील. एक्सएलआरआय स्कूल ऑफ मॅनेजमेंट, इंडियन बिझिनेस स्कूल हैदराबाद अशा विविध संस्थांमधील अध्यापक विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी येणार आहेत. सुरुवातीच्या तुकडीला त्यांच्या फीमध्ये 50 टक्के रक्कम स्कॉलरशिपरुपाने मिळणार आहे. सरकारी स्कॉलरशिपसह या अभ्यासक्रमांसाठी 75 हजार फी असेल.2014 साली केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली सरकार स्थापन झाल्यावर मांडण्यात आलेल्या पहिल्या रेल्वे अर्थसंकल्पात या विद्यापिठाची घोषणा करण्यात आली होती.

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रrailwayरेल्वेGujaratगुजरातNarendra Modiनरेंद्र मोदी