शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

'शान' इंडिया ! NASA ने नव्हे तर भारतीय इंजिनिअरनेच 'विक्रम लँडर'चा पत्ता शोधला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 13:08 IST

नासाकडून ट्विट करुन एका फोटो शेअर करण्यात आला आहे. 7 सप्टेंबरला इस्रोचा विक्रम लँडरसोबतचा संपर्क तुटला

चेन्नई - अमेरिकेची अंतराळ संस्था नासानं चांद्रयान-२ मोहिमेबद्दल मोठी माहिती दिली आहे. विक्रम लँडरचे तुकडे सापडल्याचा दावा नासाकडून करण्यात आला आहे. नासाच्या लूनार रेकनेन्सेस ऑर्बिटरनं विक्रम लँडरचा फोटो टिपला आहे. विशेष म्हणजे नासाने हा दावा केलाय, तो एका भारतीय इंजिनिरने दिलेल्या माहितीतूनच हेही आता समोर येतंय. चेन्नई येथील ट्विटवर शान नाव असलेल्या या युवक इंजिनिअरनेच विक्रम लँडरशी सर्वात प्रथम संपर्क साधला होता. 

नासाकडून ट्विट करुन एका फोटो शेअर करण्यात आला आहे. 7 सप्टेंबरला इस्रोचा विक्रम लँडरसोबतचा संपर्क तुटला. त्यानंतर इस्रोनं अनेकदा विक्रमशी संपर्क साधण्याचे प्रयत्न केले. मात्र त्यात इस्रोला अपयश आलं. आता, नासाने विक्रम लँडरचा शोध लागल्याचं सांगितलंय. नासाच्या लूनार रेकनेन्सेस ऑर्बिटरनं (एलआरओ) चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या विक्रम लँडरच्या तुकड्यांचा फोटो प्रसिद्ध केला आहे. विक्रम लँडर ज्या ठिकाणी उतरणार होतं, त्यापासून 750 मीटर अंतरावर नासाला त्याचे तुकडे सापडले आहेत. विक्रमचे तीन मोठे तुकडे 2x2 पिक्सलचे आहेत. नासानं रात्री दीडच्या सुमारास विक्रम लँडरच्या तुकड्यांचा फोटो प्रसिद्ध केला. लूनार रेकनेन्सेस ऑर्बिटरला विक्रमचे तीन तुकडे दिसल्याची माहिती नासानं ट्विटमधून दिली. 

नासाने भारतीय अभियंता शन्मुगा सुब्रमनियम याला विक्रम लँडर शोधण्याचं श्रेय दिलं होतं. 3 ऑक्टोबरलाच सुब्रमनियमने विक्रम लँडरचा ठावठिकाणा स्पष्टीकरणासह सांगितला होता. याबाबत नासानेही त्यांच्या संकेतस्थळावर ही गोष्ट नमूद केली आहे. शन्मुगाने दोन फोटो ट्विट केले होते. त्यापैकी एक फोटो 2017 चा होता आणि एक फोटो सध्याचा. यात त्याने नव्या फोटोत दिसणारा पांढरा ठिपका हा विक्रम लँडर असू शकतो हे असं म्हटलं होतं. त्यासाठी त्यानं इमेजचे पिक्सेल आणि विक्रम लँडरचे आकारमान याची गणितीय मांडणीही केली होती. त्याच्या आधारे हा विक्रम लँडर असण्याची शक्यता शन्मुगाने व्यक्त केली होती. त्यानंतर नासाने दोन महिन्यांनी विक्रम लँडर सापडल्याची माहिती दिली. शन्मुगानेही आज ट्विट करुन नासाने दिलेल्या क्रेडिटबद्दल माहिती दिली आहे.  नासानं एक किलोमीटर अंतरावरुन विक्रम लँडरचे फोटो टिपले आहेत. यामध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडरच्या क्रॅश लँडिंगमुळे झालेला परिणाम दिसून येत आहे. विक्रमला चंद्रावर यशस्वी लँडिंग करता आलं नाही. विक्रमचं लँडिंग चुकल्यानं त्याचे चंद्राच्या पृष्ठभागावर झालेले परिणाम नासानं टिपलेल्या फोटोत स्पष्टपणे दिसत आहेत. इस्रोनं नासाशी संपर्क साधून विक्रम लँडरसंदर्भातील विस्तृत माहिती मागितली आहे. नासा विक्रम लँडरबद्दलचा एक अहवाल इस्रोला देणार आहे. यामधून विक्रमच्या क्रॅश लँडिंगबद्दलची अधिक माहिती मिळू शकेल. विक्रम लँडरच्या संदर्भातील माहिती मिळण्याची शक्यता नासानं याआधीच व्यक्त केली होती. विक्रमचं क्रॅश लँडिंग झालेल्या भागावरुन लूनार रेकनेन्सेस ऑर्बिटर जाणार असल्यानं विक्रम लँडरशी संबंधित माहिती हाती लागू शकते, अशी शक्यता नासाकडून वर्तवण्यात आली होती. याआधी 17 सप्टेंबरला नासाचं ऑर्बिटर विक्रमच्या लँडिंग साईटवरुन गेलं होतं. मात्र त्यावेळी विक्रमशी संबंधित माहिती नासाला मिळाली नव्हती.   

टॅग्स :NASAनासाChandrayaan 2चांद्रयान-2isroइस्रोTwitterट्विटर