परमिशन ग्रँटेड! 'मिशन चांद्रयान- 3'च्या उड्डाणासाठी सरकारची मंजूरी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 12:18 PM2020-01-01T12:18:51+5:302020-01-01T12:35:29+5:30

चांद्रयान-2 या महत्त्वाकांक्षी मोहिमेदरम्यान विक्रम लँडरचे चंद्राच्या पृष्टभागावर यशस्वीरीत्या लँडिंग करता न आल्याने इस्रोला आणि देशवासीयांना मोठा धक्का बसला होता.

Indian Space Research Organisation Chief K Sivan saysGovernment has approved Chandrayan-3 | परमिशन ग्रँटेड! 'मिशन चांद्रयान- 3'च्या उड्डाणासाठी सरकारची मंजूरी

परमिशन ग्रँटेड! 'मिशन चांद्रयान- 3'च्या उड्डाणासाठी सरकारची मंजूरी

Next

नवी दिल्ली: चांद्रयान-2 या महत्त्वाकांक्षी मोहिमेदरम्यान विक्रम लँडरचे चंद्राच्या पृष्टभागावर यशस्वीरीत्या लँडिंग करता न आल्याने इस्रोला आणि देशवासीयांना मोठा धक्का बसला होता. मात्र या अपयशातून सावरत आता इस्रोने पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. चांद्रयान- 3 मोहिमेसाठी सरकारने देखील मान्यता दिली असल्याचे इस्त्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

के. सिवन म्हणाले की, चांद्रयान- 3 मोहिमेसाठी केंद्र सरकारने मान्यता दिली असून या मोहिमेवर सध्या वेगाने काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच चांद्रयान-2 मोहिमेवर चांगली प्रगती केली होती. लँडर चंद्राच्या पृष्टभागावर आदळून तुटला असला तरी चांद्रयान-2 मोहिमेवेळी पाठवलेले ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे कार्यरत आहे. तसेच पुढील सात वर्षांपर्यंत ऑर्बिटर कार्यरत राहणार असल्याचे के. सिवन यांनी सांगितले.त्याचप्रमाणे गगनयान मिशनचं डिझाईन पूर्ण तयार असून या मोहिमेसाठी 4 आंतराळवीरांची निवड करण्यात आली आहे अशी माहिती देखील के. सिवन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

चांद्रयान-2 मोहिमेदरम्यान लँडरला चंद्राच्या पृष्टभागावार यशस्वीरीत्या उतरवण्यात अपयश आल्यानंतर इस्रोने चंद्रावर पुन्हा एकदा झेप घेण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी इस्रोने विविध समित्यांची नियुक्ती केली आहे. तसेच तीन उपसमित्यांच्या पॅनलसोबत उच्चस्तरीय बैठकाही झाल्या आहेत. 

दरम्यान, चांद्रयान-2 मोहिमेवेळी लँडर चंद्राच्या पृष्टभागावर आदळून तुटला होता. त्यामुळे पुढील मोहिमेसाठी लँडरचे पाय हे अधिक मजबूत करण्यात येणार आहेत. त्यामुळे वेगाने लँडिंग झाले तरी लँडरची मोडतोड होणार नाही. तसेच इस्रो एक नवा रोव्हर आणि लँडर तयार करत आहे. मात्र लँडरचे वजन आणि त्यात लावण्यात येणाऱ्या उपकरणांबाबत अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.  

Web Title: Indian Space Research Organisation Chief K Sivan saysGovernment has approved Chandrayan-3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.