जगभरात सुरू असलेलं कोरोना व्हायरसचं थैमान थांबयचं नाव घेत नाहीये. दररोज कोरोना व्हायरसमुळे हजारो लोकांचा जीव जात आहे. दरम्यान भारतीय वैज्ञानिकांना एक मोठं यश मिळालं आहे. वैज्ञानिकांनी पहिल्यांदाच कोरोना व्हायरसचा मायक्रोस्कोपने घेतलेला फोटो जारी केला आहे. 

असे सांगितले जात आहे की, या फोटोमुळे वैज्ञानिकांना पुढील रिसर्चमध्ये मोठा फायदा होणार आहे. सोबतच अशीही आशा केली जात आहे की, उपचारासाठी वॅक्सिन बनवण्यातही यश मिळेल.

भारतात कोरोना व्हायरसची पहिली केस 30 जानेवारील केरळमध्ये समोर आली होती. वैज्ञानिकांनी या व्हायरसचा शिकार होणाऱ्या पहिल्या व्यक्तीच्या घशातून कोरोना व्हायरसचं सॅम्पल घेतलं होतं. इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चच्या ताज्या अंकात हा फोटो प्रकाशित करण्यात आला आहे.

औषधांचा शोध

कोरोना व्हायरसचं औषध विकसित करण्यासाठी भारत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनसोबत जगातल्या अनेक देशांसोबत परीक्षणात भागीदारी करू शकतो. परीक्षणानंतर लवकर यावरील औषधाचा शोध लागू शकतो असं तज्ज्ञांनी सांगितलं.

फ्रान्सचा दावा

दरम्यान फ्रान्सने दावा केला आहे की, त्यांनी या व्हायरला मात देणारं औषध शोधलं आहे. सुरवातीच्या परीक्षणातून हे समोर आलं आहे की, या औषधाने 6 दिवसाच्या आत संक्रमण गंभीर स्थितीत पोहोचण्यापासून रोखलं जाऊ शकतं. फ्रान्सच्या इन्स्टिट्यूट हॉस्पिटल युनिव्हर्सिटीतील संक्रमित आजारांचे तज्ज्ञ प्राध्यापक डिडाअर राओ यांनी दावा केला आहे की, त्यांनी नव्या औषधाचं यशस्वी परीक्षण केलं आहे. त्यांनी औषधाच्या ट्रायलचा एक व्हिडीओही शेअर केला आहे.

Web Title: Indian scientists have revealed a microscopy image of coronavirus api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.