मेगा प्लान, दुसरी स्लीपर वंदे भारत ट्रेन कधी सुरू होणार? ‘या’ मार्गावर चालवण्याची योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 15:25 IST2026-03-06T15:23:30+5:302026-03-06T15:25:01+5:30

Sleeper Vande Bharat Train: मे महिन्यानंतर स्लीपर वंदे भारत ट्रेनची बांधणी जलदगतीने केली जाणार आहे.

indian railways mega plan when will the second sleeper vande bharat train start plan to run on this route | मेगा प्लान, दुसरी स्लीपर वंदे भारत ट्रेन कधी सुरू होणार? ‘या’ मार्गावर चालवण्याची योजना

मेगा प्लान, दुसरी स्लीपर वंदे भारत ट्रेन कधी सुरू होणार? ‘या’ मार्गावर चालवण्याची योजना

Sleeper Vande Bharat Train: हावडा ते कामाख्या मार्गावर भारताची पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आली आहे. अल्पावधीच या ट्रेनला प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला आहे. प्रवाशांच्या फिडबॅकनुसार भारतीय रेल्वे वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या सेवेत बदलही करत आहे. तसेच २४ कोचच्या स्लीपर वंदे भारत ट्रेनबाबत रेल्वे तयारी करत असल्याचे म्हटले जात आहे. यातच आता दुसरी स्लीपर वंदे भारत ट्रेन कधी सुरू होणार, कोणत्या मार्गावर धावणार, याकडे देशातील प्रवाशांचे लक्ष लागल्याचे म्हटले जात आहे. 

रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, रेल्वेने या वर्षाच्या अखेरीस १२ वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची योजना तयारी केली आहे. त्यांचे उत्पादनही वेगाने सुरू आहे. मे महिन्यापर्यंत आणखी दोन वंदे भारत स्लीपर रुळांवर येतील, अशी अपेक्षा आहे. वंदे भारत स्लीपर बीईएमएल आणि आयसीएफ येथे तयार केले जात आहेत. मे महिन्यानंतर स्लीपर वंदे भारत ट्रेनची बांधणी जलदगतीने केली जाणार आहे. 

मेगा प्लान, दुसरी स्लीपर वंदे भारत ट्रेन कधी सुरू होणार?

कोणत्याही नवीन ट्रेन डिझाइनच्या पहिल्या एक किंवा दोन रॅकचे उत्पादन करण्यास वेळ लागतो, परंतु त्यानंतर उत्पादन वेगाने सुरू होते. वंदे भारत स्लीपर ट्रेनसाठीही असेच उत्पादन राबविले जाईल. दुसरीकडे, भारतीय रेल्वेने एकूण २६० वंदे भारत स्लीपर ट्रेनसेट्स तयार करण्याची योजना आखली आहे. त्यांचे उत्पादन टप्प्याटप्प्याने केले जाईल. बेंगळुरू आणि चेन्नई कोच कारखान्यांमध्ये याची बांधणी केली जात आहे. या ट्रेन "कवच" सुरक्षा प्रणाली आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वैशिष्ट्यांनी सुसज्ज असतील. भारतीय रेल्वे आणखी वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होण्याची तयारी करत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, मार्चपर्यंत आणखी दोन वंदे भारत स्लीपर ट्रेन तयार होतील. 

दरम्यान,  दिल्ली-अमृतसर, दिल्ली-श्रीनगर, दिल्ली-मुंबई, दिल्ली-कोलकाता अशा प्रवाशांची सर्वाधिक मागणी असलेल्या मार्गांवर स्लीपर वंदे भारत ट्रेन प्रस्तावित आहे. ICF मध्ये ५० रेक बांधले जातील आणि ते अन्य रॅकपेक्षा वेगळे असतील. या रेकमध्ये २४ कोच असतील ज्यात पेंट्री कार असेल.

 

Web Title : स्लीपर वंदे भारत: दूसरी ट्रेन की लॉन्च तिथि और रूट योजना का खुलासा।

Web Summary : भारत की योजना है कि वह साल के अंत तक 12 स्लीपर वंदे भारत ट्रेनें लॉन्च करे, जिनमें से दो मई तक आने की उम्मीद है। बीईएमएल और आईसीएफ में निर्माण बढ़ रहा है। दिल्ली-अमृतसर जैसे उच्च मांग वाले मार्गों को प्राथमिकता दी गई है।

Web Title : Sleeper Vande Bharat: Second train launch date and route plan revealed.

Web Summary : India plans to launch 12 Sleeper Vande Bharat trains by year-end, with two expected by May. Manufacturing is ramping up at BEML and ICF. High-demand routes like Delhi-Amritsar are prioritized.