शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

रेल्वेकडून पहिल्यांदाच १९ अधिकाऱ्यांवर कारवाई, एकाचवेळी सर्वांना केलं बडतर्फ! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 11:30 IST

indian railway : कारवाई करण्यात आलेल्या १९ अधिकाऱ्यांमध्ये १० ज्वाइंट सेक्रेटरी (Joint Secretary) स्तरावरील अधिकारी असल्याचे सांगितले जात आहे.

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने (Indian Railways)इतिहासात पहिल्यांदा आपल्या विभागातील अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली आहे. रेल्वे विभागाने आपल्या १९ अधिकाऱ्यांना नोकरीवरून काढले आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रातील मोदी सरकारने खराब कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करत सरकारी नोकरांच्या नियतकालिक आढावा (Periodic Review) अंतर्गत केंद्रीय नागरी सेवा (CCS) पेन्शन नियम, १९७२ च्या कलम ५६ (J)/(I), नियम ४८ नुसार बुधवारी विभागाने १९ अधिकाऱ्यांना बडतर्फ केले आहे.

दरम्यान, कारवाई करण्यात आलेल्या १९ अधिकाऱ्यांमध्ये १० ज्वाइंट सेक्रेटरी (Joint Secretary) स्तरावरील अधिकारी असल्याचे सांगितले जात आहे. हे सर्व अधिकारी पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, सीएलडब्ल्यू, नार्थ फ्रंट रेल्वे, पूर्व रेल्वे, दक्षिण-पश्चिम रेल्वे, डीएलडब्ल्यू, उत्तर-मध्य रेल्वे, आरडीएसओ, ईडी सेलचे सेलेक्शन ग्रेट आणि उत्तर रेल्वेमधील विविध पदांवर कार्यरत होते. 

आतापर्यंत ७७ अधिकाऱ्यांनी घेतली व्हीआरएसअश्विनी वैष्णव यांनी (Railway Minister Ashwani Vaishnav) केंद्रीय रेल्वेमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर आतापर्यंत जवळपास ७७ रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व्हीआरएस (VRS) घेतली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या ११ महिन्यात जवळपास ९६ अधिकाऱ्यांना व्हीआरएस देण्यात आला आहे. 

'निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही'दरम्यान, अशाप्रकारच्या कारवाईमुळे मंत्रालय आणि केंद्र सरकारकडून स्पष्ट संदेश देण्यात येत आहे की, कामकाजाच्या दरम्यान निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही आणि या नियमांद्वारे सरकार कामाची समीक्षा करून जबरदस्तीने व्हीआरएस सुद्धा देऊ शकते. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अधिकाऱ्यांना इशारा दिला होता की, जे अधिकारी काम नाही करू शकत, त्यांनी व्हीआरएस घेऊन घरी बसावे. अन्यथा त्यांना बडतर्फ केले जाईल. 

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे