indian railway showed sensitivity to rescue girl child | तीन वर्षांच्या चिमुकलीसाठी तब्बल 200 किमी नॉन स्टॉप धावली ट्रेन, जाणून घ्या नेमकं काय आहे "हे" प्रकरण

तीन वर्षांच्या चिमुकलीसाठी तब्बल 200 किमी नॉन स्टॉप धावली ट्रेन, जाणून घ्या नेमकं काय आहे "हे" प्रकरण

नवी दिल्ली - प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेकडून विविध सुविधा या देण्यात येत असतात. रेल्वे प्रवाशांच्या सेवेसाठी सदैव तप्तर असते. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. अपहरण करण्यात आलेल्या एका तीन वर्षांच्या चिमुकलीच्या सुटकेसाठी रेल्वे न थांबता तब्बल 200 किमी धावल्याची घटना समोर आली आहे. चिमुकलीसाठी रेल्वेने ललितपूर ते भोपाळ हे जवळपास 200 किमीचं अंतर पार करून तिची सुखरुप सुटका केली आहे. 

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी देखील रेल्वेच्या या ऑपरेशनचं कौतुक केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचं ट्विट केलं आहे. तीन वर्षांच्या चिमुकलीचं अपहरण करण्यात आलं होतं. धक्कादायक बाब म्हणजे तिच्या वडिलांनीच तिचं अपहरण केलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील ललितपूर रेल्वे स्थानकात सोमवारी एक महिला रेल्वे पोलिसांकडे आली. एका व्यक्तीने आपल्या तीन वर्षांच्या मुलीला जबरदस्तीने उचलून नेल्याचं सांगितलं. 

महिलेने माहिती देताच पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यामध्ये एक व्यक्ती मुलीला घेऊन राप्तीसागर एक्स्प्रेसमध्ये बसल्याचं दिसलं. ही गाडी काही वेळापूर्वीच रेल्वेस्थानकातून रवाना झालेली होती. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी याची माहिती झाशी रेल्वे स्थानकावर असलेल्या पोलीस निरीक्षकाला दिली. त्यांनी अपहरण करणारी व्यक्ती फरार होऊ नये म्हणून भोपाळच्या नियंत्रण कक्षाला ट्रेन न सोडण्याची विनंती केली. 

ललितपूर रेल्वे स्थानकावरून सुटलेली ही गाडी कुठेही न थांबता सलग भोपाळपर्यंत धावली. त्यानंतर तीन वर्षांच्या चिमुकलीची सुटका करण्यात आली. याप्रकरणी आरोपीची अधिक चौकशी केली असता तोच मुलीचा बाप असल्याची माहिती तपासात समोर आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचं पत्नीशी भांडण झालं. त्यानंतर तो मुलीला घेऊन घराबाहेर पडला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Read in English

English summary :
indian railway showed sensitivity to rescue girl child

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: indian railway showed sensitivity to rescue girl child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.