शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

Corona : रेल्वेने तिकीट रिफंडच्या नियमांत केलाय मोठा बदल, तुम्हालाही माहीत असायलाच हवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2020 09:51 IST

या निर्णयानुसार आता, 21 मार्च ते 15 एप्रिलदरम्यान रेल्वेने एखादी रेल्वेगाडी रद्द केल्यास, कुठल्याही स्थानकावर प्रवासाच्या तारखेपासून 45 दिवसांच्या आत तिकीट जमा करून रिफंड घेता येणार आहे. सध्या रेल्वे रद्द झाल्यानंतर तीन तासांच्या आतच रिंफंड मिळवता येतो.

ठळक मुद्देआता प्रवासाच्या तारखेपासून 45 दिवसांच्या आत तिकीट जमा करून रिफंड घेता येणार21 मार्च ते 15 एप्रिलदरम्यान लागू असेल हा नियमटीडीआर फाइल करण्याचा कालावधी 10 दिवसांवरून 60 दिवस 

नवी दिल्ली - भारतीय रेल्वेने ट्रेन, प्लॅटफॉर्म आणि रेल्वेस्थानकांवरील गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता, 21 मार्च ते 15 एप्रिलदरम्यान रेल्वेने एखादी रेल्वेगाडी रद्द केल्यास, कुठल्याही स्थानकावर प्रवासाच्या तारखेपासून 45 दिवसांच्या आत तिकीट जमा करून रिफंड घेता येणार आहे. सध्या रेल्वे रद्द झाल्यानंतर तीन तासांच्या आतच रिंफंड मिळवता येतो.

या शिवाय, रेल्वेगाडी रद्द न झाली नाही, मात्र या काळात प्रवाश्याला प्रवास करायचा नसेल तर त्याला प्रवासाच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आता तो स्थानकावर जाऊन TDR (Ticket Deposit Receipt) फाइल करू शकतो. सध्या असे तीन दिवसांच्या आत करणे अनिवार्य होते. या आदेशानुसार, चीफ कॉमर्शियल ऑफिसरसमोर टीडीआर फाइल करण्याचा कालावधी 10 दिवसांवरून 60 दिवस करण्यात आला आहे, तर ज्या प्रवाशाला 139 च्या माध्यमाने तिकीट रद्द करायचे असेल त्यांना प्रवासाच्या तारखेच्या 30 दिवस आगोदर कुठल्याही काउंटरवरून  रिफंड मिळवता येईल. सध्या रेल्वे रवाना होण्याच्या निर्धारित वेळेपर्यंत रिफंड मिळवता येत होता. 

भारतीय रेल्वेनने रविवारी जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर रविवारी 3700 रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. यात 2400 पॅसेंजर तर, 1300 लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. रविवारी पहाटे 4 ते रात्री 10 या काळात या रेल्वे बंद राहणार आहेत. 

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉरपोरेशनने (आयआरसीटीसी) 22 मार्चपासून खाण्यासंदर्भातील सर्व सुविधा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आला  रेल्वेगाड्यांमधील प्रवाशांना चहा, नाश्ता आणि भोजनही मिळणार नाही. रेल्वेस्थानकांवरील फूड प्लाझा, रिफ्रेशमेंट, सेल किचन आणि जन आहारदेखील बंद असेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेMaharashtraमहाराष्ट्रpassengerप्रवासी