Indian Railway: भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन जिथे जाण्यासाठी लागतो पासपोर्ट आणि व्हिसा, २४ तास असतो कडेकोट बंदोबस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 13:55 IST2022-04-03T11:22:40+5:302022-04-03T13:55:13+5:30
Indian Railway News: सर्वसाधारणपणे रेल्वेस्टेशनवर जाण्यासाठी साधारणपणे तिकीट किंवा प्लॅटफॉर्म तिकीट लागते. मात्र भारतामध्ये असेही एक रेल्वे स्टेशन आहे. जिथे जाण्यासाठी तुम्हाला पासपोर्ट आणि व्हिसाची गरज भासते.

Indian Railway: भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन जिथे जाण्यासाठी लागतो पासपोर्ट आणि व्हिसा, २४ तास असतो कडेकोट बंदोबस्त
नवी दिल्ली - भारतीय रेल्वे ही जगातील चौथी आणि आशियामधील सर्वात मोठी रेल्वे आहे. उपलब्ध माहितीनुसार भारतामध्ये तब्बल ८ हजार ३३८ रेल्वे स्टेशन आहेत. ही रेल्वे स्टेशन्स संपूर्ण देशात पसरलेली आहेत. सर्वसाधारणपणे रेल्वेस्टेशनवर जाण्यासाठी साधारणपणे तिकीट किंवा प्लॅटफॉर्म तिकीट लागते. मात्र भारतामध्ये असेही एक रेल्वे स्टेशन आहे. जिथे जाण्यासाठी तुम्हाला पासपोर्ट आणि व्हिसाची गरज भासते. जर कुणी पासपोर्ट आणि व्हिसाशिवाय तिथे गेला तर त्याला तुरुंगात जावं लागतं.
या रेल्वे स्टेशनचं नाव आहे अटारी. आता या रेल्वे स्टेशनला अटारी श्याम सिंह स्टेशन या नावाने ओळखले जाते. येथे जाण्यासाठी तुमच्याकडे पाकिस्तानचा व्हिसा असणं अनिवार्य करण्यात आलं आहे. येथे कायम गुप्तचर आणि संरक्षण यंत्रणांचा २४ तास कडेकोट पहारा असतो. तसेच या स्टेशनवर व्हिसाशियाव पोहोचणाऱ्या देशातील कुठल्याही नागरिकाला १४ फॉरेन अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंद केला जातो. त्यावर जामीन मिळणे खूप अवघड असते.
या रेल्वे स्टेशनवरून देशातील सर्वात व्हीव्हीआयपी ट्रेन असलेली समझौता एक्स्प्रेस रवाना होत अले. दरम्यान, काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यापासून समझोता एक्स्प्रेस बंद आहे. हे देशातील पहिले रेल्वे स्ठेशन आहे जिथे ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी सीमा शुल्क विभागासह ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचीही परवानगी घेतली जाते. येथून रेल्वे तिकीट खरेदी करणाऱ्या प्रवाशाचा पासपोर्ट क्रमांक लिहून घेतला जातो. तसेच त्यांना कन्फर्म तिकीट मिळते.
अटारी पंजाबमधील भारताचं शेवटं रेल्वे स्टेशन आहे. याच्या एका बाजूला अमृतसर तर दुसऱ्या बाजूला लाहोर आहे. हे रेल्वे स्टेशन फार मोठे नाही आहे, मात्र त्याचं महत्त्व खूप मोठं आहे. ट्रेन बंद झाल्यानंतरही या स्टेशनवर काही आवश्यक काम सुरू असतं. मात्र येथे सहजपणे जाण्याची परवानगी मिळत नाही.