शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

हिंदी महासागरात दिसल्या चिनी युद्धनौका, भारतीय नौदलानं असं केलं स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2018 12:47 PM

जेव्हा हिंदी महासागरात चीनच्या तीन युद्धनौका दिसल्या. त्यावेळी भारतीय नौदलानंही त्यांचं हटके अंदाजात ट्विट करत स्वागत केलं.

नवी दिल्ली- मागील काही दिवसांपासून भारत आणि चीन यांच्या संबंधात तणाव निर्माण झालाय. डोकलामच्या मुद्द्यावरून हा तणाव पराकोटीला गेला होता. चीनबरोबर भारताचे राजनैतिक संबंधही फारसे चांगले नाहीत. अशात चीन सातत्यानं हिंदी महासागरात घुसखोरीचा प्रयत्न करत असतो. परंतु भारताकडूनही चीनला जशात तसे उत्तर मिळते.मंगळवारी जेव्हा हिंदी महासागरात चीनच्या तीन युद्धनौका दिसल्या. त्यावेळी भारतीय नौदलानंही त्यांचं हटके अंदाजात ट्विट करत स्वागत केलं. हिंदी महासागरातल्या भारताच्या हद्दीत चीनच्या 29व्या पायरसी एस्कॉर्ट फोर्सचं स्वागत आहे, हॅपी हंटिंग, असं म्हणत बीजिंगला भारतानं मोठा संदेश दिला आहे. भारतीय नौदलानं केलेल्या स्वागतानं चीनही काहीसा अचंबित झाला.गेल्या काही दिवसांपासून चीन हिंदी महासागरात स्वतःचा दबदबा वाढवण्याचा प्रयत्न करतोय. भारतीय नौदलानं चीनच्या युद्धनौकांना ज्या प्रकारे पकडलं, त्यावरून स्पष्ट होतंय की चीन हिंदी महासागरातही स्वतःचं प्रभुत्व वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. समुद्रीचाच्यांना कंठस्नान घालण्यासाठी चीनच्या युद्धनौका हिंदी महासागरातून ब-याचदा आफ्रिकेतल्या जिबुती आणि पाकिस्तानतल्या ग्वादार, कराची येथे ये-जा करत असतात. चीननं सामरिक विषयांवरून शेजारच्या देशांसोबत नेहमी वाद ओढवून घेतलाय. चिनी नौसेनेनं गेल्या काही दिवसांपूर्वी एक पत्रिका काढली होती. त्यात चीनच्या हिंदी महासागरातल्या रणनीतीचाही उल्लेख होता. त्या पत्रिकेत म्हटलं होतं की, स्थानिक निवडणुकांदरम्यान सतर्कता बाळगा, तसेच सहका-याच्या हालचालींवर नजर ठेवा. हळूहळू दुस-या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करा. चीननं ब-याचदा भारतातल्या अरुणाचल प्रदेश, डोकलाम, उत्तराखंड सीमेजवळ घुसखोरीचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेची भारत आणि चीनमध्ये तणावपूर्ण स्थिती होती. 

टॅग्स :chinaचीनwar shipयुद्ध नौका