शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

गुलामीचं निशाण आज खाली उतरलं, नौदलाचं नवं निशाण शिवरायांना समर्पित; PM मोदींची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 11:05 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज कोचीच्या शिपयार्डमध्ये स्वदेशी आयएनएस विक्रांत हे युद्धवाहू जहाज आज नौदलाच्या ताफ्यात दाखल झालं.

कोची-

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज कोचीच्या शिपयार्डमध्ये स्वदेशी आयएनएस विक्रांत हे युद्धवाहू जहाज आज नौदलाच्या ताफ्यात दाखल झालं. आयएनएस विक्रांत हे भारतीय नौदलाच्या इतिहासातील आजवरचे सर्वात मोठे जहाज ठरणार आहे. आयएनएस विक्रांत आत्मनिर्भर भारताचं प्रतिक ठरणार आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. मोदींच्या हस्ते यावेळी भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजाचंही अनावरण करण्यात आलं. नौदलाचा नवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित करत असल्याचं मोदींनी म्हटलं. 

नौदलाच्या नव्या निशाणावरुन आता सेंट जॉर्ज क्रॉस हटवण्यात आलं आहे. नव्या निशाणात डाव्या बाजूस तिरंगा आणि उजव्या बाजूस निळ्या रंगाच्या बॅकग्राऊंडवर सोनेरी रंगात अशोक चिन्ह साकारण्यात आलेलं आहे. त्याखाली संस्कृत भाषेत 'शं नो वरुण:' असं लिहीण्यात आलं आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज २ सप्टेंबर २०२२ या ऐतिहासिक दिवशी इतिहास बदलून टाकणारी आणखी एक घटना घडली आहे. आज भारताने गुलामगिरीचे ओझे उतरवले आहे. भारतीय नौदलाला आजपासून नवा ध्वज मिळाला आहे. आतापर्यंत भारतीय नौदलाच्या ध्वजावर गुलामगिरीची ओळख होती. मात्र आजपासून छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने नौदलाचा नवा झेंडा समुद्रात आणि आकाशात डौलानं फडकणार आहे.

इंग्रजांनी भारतीय जहाजांवर घातले होते निर्बंध"छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी शक्तीच्या बळावर असं नौदल उभारलं की ज्यामुळे शत्रूंची झोप उडाली. इंग्रज भारतात आले तेव्हा त्यांना भारतीय जहाजांची ताकद आणि त्याद्वारे होणारा व्यापार याची भीती वाटायची. म्हणूनच त्यांनी भारताच्या सागरी शक्तीचे कंबरडे मोडण्याचा निर्णय घेतला. त्याकाळी ब्रिटीश संसदेत कायदा करून भारतीय जहाजे आणि व्यापार्‍यांवर किती कडक निर्बंध लादले गेले याचा इतिहास साक्षीदार आहे", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 

'विक्रांत'वर महिलांनाही स्थान"जेव्हा विक्रांत देशाच्या सागरी क्षेत्राच्या रक्षणासाठी उतरेल तेव्हा नौदलाच्या अनेक महिला सैनिकही जहाजावर तैनात असतील. महासागराच्या अफाट शक्तीने, अमर्याद स्त्री शक्तीने ती नव्या भारताची उदात्त ओळख बनत आहे. आता भारतीय नौदलाने महिलांसाठी आपल्या सर्व शाखा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. जे निर्बंध होते ते आता हटवले जात आहेत. ज्याप्रमाणे समर्थ लहरींना सीमा नसतात, त्याचप्रमाणे भारतातील महिलांनाही आता कोणत्याही सीमा किंवा बंधनं नाहीत. थेंब थेंब पाण्यानं अथांग महासागर बनतो. त्याचप्रमाणे भारतातील प्रत्येक नागरिकाने 'वोकल फॉर लोकल' हा मंत्र जगायला सुरुवात केली तर देश स्वावलंबी व्हायला फारसा वेळ लागणार नाही", असं मोदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाindian navyभारतीय नौदल