शत्रूचे हल्ले हवेतच परतून लावणार; नौदलाला मिळाले पहिले मेड-इन-इंडिया 3D सर्व्हिलन्स रडार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 17:00 IST2025-09-11T17:00:31+5:302025-09-11T17:00:55+5:30
Indian NAVY: टाटा समूहच्या कंपनीने तयार केले स्वदेशी रडार!

शत्रूचे हल्ले हवेतच परतून लावणार; नौदलाला मिळाले पहिले मेड-इन-इंडिया 3D सर्व्हिलन्स रडार
Indian NAVY: भारतीय नौदलाला आज (११ सप्टेंबर २०२५) पहिले स्वदेशी सर्व्हिलान्स रडार 3D-ASR-Lanza-N मिळाले आहे. टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेड (TASL) ने स्पॅनिश कंपनी इंद्रासोबत तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या मदतीने हे विशेष रडार बनवले आहे. असे रडार बनवणारी ही पहिलीच भारतीय कंपनी आहे. संरक्षण स्वावलंबनाच्या भारताच्या प्रयत्नात ही कामगिरी एक महत्त्वाचे पाउल मानले जाते.
रडारला या युद्धनौकेवर बसवण्यापूर्वी, त्याच्या विस्तृत समुद्री चाचण्या घेण्यात आल्या आहेत. टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेड (TASL) ने या संदर्भात एक प्रेस रिलीज देखील जारी केली आहे. यामध्ये कंपनीचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक सुकरण सिंह म्हणाले, इंद्रा कंपनीसोबतचे आमचे सहकार्य भारतातील रडार उत्पादन क्षमता मजबूत करण्याची आमची वचनबद्धता प्रतिबिंबित करते. जमीनवरील समन्वय, तांत्रिक कौशल्य आणि मजबूत पुरवठा साखळीद्वारे आम्ही प्रगत संरक्षण तंत्रज्ञानासाठी एक मजबूत परिसंस्था तयार करत आहोत.
बंगळुरुमध्ये रडार कारखाना स्थापन
इंद्रा नेव्हल बिझनेस हेड अना बुएनिडा म्हणाल्या, हा प्रकल्प फक्त रडारची डिलिव्हरी आणि तैनाती करण्यापुरता मर्यादित नाही. यामुळे आम्हाला भारतातील बंगळुरुमध्ये रडार कारखाना स्थापन करण्यास मदत झाली. यामुळे आम्हाला अधिक कार्यक्षमतेने आणि जवळून सेवा प्रदान करता आल्या.
TASL कंपनी काय करते?
टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेड ही टाटा ग्रुपची कंपनी आहे, जी भारतात विमान वाहतूक आणि संरक्षण संबंधित तंत्रज्ञान तयार करते. ही कंपनी विमान संरचना, इंजिन आणि सुरक्षा उपकरणे आणि वाहने यासारख्या लष्कराद्वारे वापरल्या जाणाऱ्या इतर प्रणालीदेखील तयार करते.