शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय नौदल दिन विशेष : विमानांच्या आकर्षणातून ‘ती’ची अवकाशभरारी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 06:00 IST

सब लेफ्टनंट शिवांगी स्वरूप : नौदलातील पहिली महिला वैमानिक

ठळक मुद्देडॉर्निअर विमाने ठेवणार समुद्र सीमांवर नजर कोची येथील नौदलाच्या तळावर झालेल्या एका कार्यक्रमात शिवांगी नौदलात दाखलशिवांगी या मूळच्या बिहारमधील मुझफ्फरपूर येथील संरक्षण दलात महिलांना मोठ्या संधी... डॉर्निअर विमानांद्वारे ठेवणार समुद्री सीमांवर नजर...

- निनाद देशमुख - पुणे : विमानांविषयी लहानपणापासूनच आकर्षण होते. विमानांचा आवाज ऐकला की मी घरातून पळत बाहेर येत असे. विमानांचे हे आकर्षण मी ध्येयामध्ये बदलले आणि वैमानिक होण्याचे ठरविले. घरी लष्कराची कुठलीही पार्श्वभूमी नव्हती. मी, जिद्दीने अभ्यास केला. सुरुवातीला यश आले नाही. त्यामुळे मी एमटेकमध्ये प्रवेश घेतला. मात्र, संरक्षण दलाविषयीचे आकर्षण कायम असल्याने मी माझा अभ्यास कायम ठेवला. याच प्रयत्नांमुळे मला यश आले आणि मी नौदलातील पहिली महिला वैमानिक होऊ शकले, अशी भावना नौदलातील वैमानिक सब लेफ्टनंट शिवांगी स्वरूप हिने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. शिवांगी या नौदलाचे डॉर्निअर विमान उडवून भारतीय समुद्री सीमांचे रक्षण करणार आहेत. बुधवारी देशभरात नौदल दिवस साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांआधीच कोची येथील नौदलाच्या तळावर झालेल्या एका कार्यक्रमात शिवांगी नौदलात दाखल झाल्या. नौदलाच्या दक्षिण विभागाचे फ्लॅग आॅफिसर कमांडिग-इन-चीफ व्हाईस अ‍ॅडमिरल ए. के. चावला यांच्या हस्ते सब लेफ्टनंट शिवांगी यांना नौदलातील विंग प्रदान करण्यात आले. शिवांगी या मूळच्या बिहारमधील मुझफ्फरपूर येथील आहेत. त्यांच्या शाळेजवळ त्यांनी एकदा हेलिकॉप्टर उतरताना पाहिले. तेव्हापासून त्यांना वैमानिक बनावे असे वाटत होते. महाविद्यालयीन जीवनात आल्यावर शिवांगी यांनी वैमानिक बनण्याचे ठरवले. शिवांगीच्या निर्णयाला त्यांच्या वडिलांनीही पाठिंबा दिला आणि त्यांना लागणारी सर्व मदत त्यांना दिली. शिवांगीने जिद्दीने अभ्यास करत एसएसबीची परीक्षा दिली. महाविद्यालयात असताना नौदलात जाण्यासाठी त्यांनी यूईएस परीक्षा दिली. याच दरम्यान नौदलात जाण्याचे शिवांगीने मनाशी पक्के ठरविले आणि परीक्षा दिली. मात्र, एसएसबी(सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड)ची परीक्षा आणि मुलाखत कठीण असते. या परीक्षेची प्रक्रिया मोठी असते. परीक्षा दिल्यावर मेरीट लिस्ट यायला तब्बल ६ महिने बाकी होते. याच वेळी शिवांगीने गेट परीक्षेतही चांगले गुण मिळवल्याने तिने दरम्यानच्या काळात एम.टेक. करण्याचे ठरवले. जयपूर येथील एनआयटीमध्ये तिने एमटेकसाठी प्रवेश घेतला. मात्र, तिचे लक्ष एसएसबीच्या निकालाकडे होते. एसएसबीचा निकाल आला आणि तिची निवड नौदलातील वैमानिकासाठी झाली. त्यांनी २७ एनओसी कोर्सच्या माध्यमातून एसएससी(पायलट) परीक्षा उत्तीर्ण करून नौदलातील वैमानिक पदासाठी त्या पात्र झाल्या. गेल्या जून महिन्यात त्या नौदलात दाखल झाल्या. सध्या शिवांगी नौदलातील डॉर्निअर हे टेहळणी विमान उडविणार आहेत. त्यांचे पुढील प्रशिक्षण  झाल्यावर त्या मोठी विमाने उडविण्यास पात्र ठरणार आहेत.

 संरक्षण दलात महिलांना मोठ्या संधी... संरक्षण दलाच्या लष्कर, नौदल आणि हवाई दलात महिलांना मोठ्या संधी आहेत. या संधींचे सोने महिलांनी करावे. आज महिला पुरुषांशी प्रत्येक क्षेत्रात बरोबरी करत आहेत. संरक्षण दलातही महिला आज स्वत:ला सिद्ध करत आहेत. 

................संरक्षण दलाबद्दल मला पूर्वीपासूनच आकर्षण आहे. त्यामुळेच मी या क्षेत्रात येण्याचे ठरविले. संरक्षण दले म्हणजे केवळ नोकरी नसून त्याहीपेक्षा जास्त आहे. यात शिस्तीबरोबरच जीवन जगण्याची शैली ही सामान्य जीवनापेक्षाही जास्त आहे. अभ्यास करताना मी कधीही स्वत:ला डिप्रेस होऊ दिले नाही. त्यामुळेच मी आज हे यश मिळवू शकले  आहे.- शिवांगी स्वरूप, सब लेफ्टनंट, भारतीय नौदल

..............डॉर्निअर विमानांद्वारे ठेवणार समुद्री सीमांवर नजर...समुद्रातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी नौदलातर्फे डॉर्निअर या विमानांचा वापर केला जातो. शिवांगी यांनी हे विमान उडविण्याचे प्रशिक्षण पूर्ण केले असून, या विमानातून शिवांगी या भारतीय समुद्री सीमांवर लक्ष ठेवणार आहेत. 

टॅग्स :Puneपुणेindian navyभारतीय नौदलpilotवैमानिक