शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

'भारताचा बिन लादेन' तौकिरला अटक, दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2018 13:43 IST

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीत दहशतवादी हल्ला घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या इंडियन मुजाहिद्दीनच्या अतिरेक्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.

नवी दिल्ली- प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीत दहशतवादी हल्ला घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या इंडियन मुजाहिद्दीनच्या अतिरेक्याला दिल्ली पोलिसांनी गाजीपूरमधून अटक केली आहे. दिल्ली पोलिसांनी इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी अब्दुल सुभान कुरेशी याला बेड्या ठोकल्या आहेत. गुजरातमधल्या साखळी बॉम्बस्फोटातही याचा सक्रिय सहभाग असल्याचंही समोर आलं आहे.इंडियन मुजाहिद्दीन ही दहशतवादी संघटना चालवण्यात तौकीरचा मोठा हात होता. रियाज भटकळसोबत मिळून इंडियन मुजाहिद्दीनसाठी तो काम करत होता. 2015 ते 17 दरम्यान सौदी अरेबियाला गेला होता. गेल्या काही दिवसांपासून तौकीरचं नेपाळला वास्तव्य होतं, तौकीरनं नेपाळमध्ये बनावट दस्तावेज बनवले होते. सिमीला भारतात पुन्हा सक्रिय करण्यासाठी तो आला होता. मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्रातील सिमीचं जाळं पुन्हा कार्यरत करण्यासाठी तो प्रयत्नशील होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

कुरेशीकडून बॉम्ब तयार करण्याचं सामान जप्त करण्यात आलं आहे. अब्दुल सुभान कुरेशी हा दहशतवादी 26 जानेवारी रोजी राजधानीत मोठा बॉम्बस्फोट करण्याच्या तयारीत होता. पी. चिदंबरम केंद्रीय गृहमंत्री असताना त्यांनी 50 वाँटेड दहशतवाद्यांची यादी प्रसिद्ध केली होती. त्या यादीत इंडियन मुजाहिद्दीनचा हा दहशतवादी अब्दुल सुभान कुरेशी याचंही नाव होतं.इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांना बॉम्बस्फोट घडवण्यासाठी कुरेशी हा उकसावत असल्याचंही समोर आलं आहे. दिल्लीच नव्हे तर देशातल्या इतर भागातील दहशतवादी हल्ल्यातही कुरेशी सहभाग असल्याचं उघड झालं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, 2008च्या बॉम्बस्फोटात मुजाहिद्दीनच्या ज्या दहशतवाद्यांना पकडण्यात आलं होतं. त्यांनीही चौकशीत कुरेशी याचं नाव घेतलं होतं. इतकंच नव्हे तर गुजरातमधल्या दहशतवादी हल्ल्यातही कुरेशीचा हात होता. 

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाIndian Mujahideenइंडियन मुजाहिदीनGujaratगुजरात