लडाखमध्ये भारत-चीनचे सैनिक आमनेसामने; धक्काबुक्कीमुळे तणाव वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 08:50 AM2019-09-12T08:50:49+5:302019-09-12T08:55:12+5:30

पँगाँग सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावर दोन्ही देशाचे सैनिक भिडले

indian Chinese Soldiers Scuffle In Ladakh raises tension | लडाखमध्ये भारत-चीनचे सैनिक आमनेसामने; धक्काबुक्कीमुळे तणाव वाढला

लडाखमध्ये भारत-चीनचे सैनिक आमनेसामने; धक्काबुक्कीमुळे तणाव वाढला

Next

नवी दिल्ली: एका बाजूला पाकिस्तानसोबतचा तणाव वाढला असताना आता दुसऱ्या बाजूला चीनच्या सीमावर्ती भागात भारत-चीनचे सैनिक आमनेसामने आले. दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये बुधवारी बराच काळ धक्काबुक्की झाली. पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावर हा प्रकार घडला. या परिसरातील एक तृतीयांश भाग चीनच्या नियंत्रणाखाली आहे. 

भारतीय सैन्य गस्त घालत असताना चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे सैनिक समोर आल्यानं तणाव निर्माण झाल्याची माहिती सुरक्षा दलातील सूत्रांनी दिली. या भागातील भारतीय जवानांच्या उपस्थितीचा चिनी सैन्यानं विरोध केला. यानंतर दोन्ही देशाचे जवान एकमेकांना भिडले. त्यांच्यात काही वेळ धक्काबुक्की झाली. यानंतर या भागातील लष्कराची कुमक वाढवण्यात आली. संध्याकाळी उशिरापर्यंत दोन्ही बाजूच्या सैन्यांमधील संघर्ष सुरू होता.



दोन्ही सैन्यांमध्ये निर्माण झालेला तणाव कमी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं सूत्रांच्या हवाल्यानं दिलं. त्यासाठी द्विपक्षीय व्यवस्थेअंतर्गत ब्रिगेडियर पदावरील अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्यानं दिली. 'लाईन ऑफ ऍक्चुअल कंट्रोलवरुन (एलएसी) दोन्ही देशांमध्ये मतभेद आहेत. त्यामुळेच दोन्ही देशांचं सैन्य वारंवार एकमेकांसमोर उभे ठाकतं. असा तणाव बॉर्डर पर्सनल मीटिंग आणि फ्लॅग मीटिंगच्या माध्यमातून सोडवला जातो,' असंदेखील अधिकाऱ्यानं सांगितलं. 

Web Title: indian Chinese Soldiers Scuffle In Ladakh raises tension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.