होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेल्या भारतीय कॅप्टन राकेश रंजन यांचा मृत्यू;'अवाना' जहाजावर १८ दिवसांपासून अडकले होते

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 13:35 IST2026-03-20T13:27:47+5:302026-03-20T13:35:14+5:30

इराण-इस्रायल-अमेरिका युद्धादरम्यान होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेल्या 'अवाना' जहाजाचे कॅप्टन राकेश रंजन सिंह यांचे निधन झाले आहे. ते मूळचे नालंदा जिल्ह्यातील होते आणि त्यांचे कुटुंब रांचीमध्ये राहत आहे.

Indian Captain Rakesh Ranjan dies after being stranded in the Strait of Hormuz; was stranded on the ship 'Awana' for 18 days | होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेल्या भारतीय कॅप्टन राकेश रंजन यांचा मृत्यू;'अवाना' जहाजावर १८ दिवसांपासून अडकले होते

होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेल्या भारतीय कॅप्टन राकेश रंजन यांचा मृत्यू;'अवाना' जहाजावर १८ दिवसांपासून अडकले होते

इराण-इस्रायल-अमेरिका युद्धाचा जगभर परिणाम झाला होत असल्याचे दिसत आहे. २८ फेब्रुवारीपासून होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अडकलेल्या 'अवाना' जहाजाचे कॅप्टन राकेश रंजन सिंह यांचे निधन झाले आहे. त्यांचे कुटुंब रांचीच्या अर्गोरा येथील वसुंधरा अपार्टमेंटमध्ये राहत आहे. ते मूळचे बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील बिहार शरीफचे रहिवासी आहेत.

कॅप्टन राकेश रंजन सिंह यांच्या निधनाच्या बातमीने त्यांचे संपूर्ण कुटुंब हादरले आहे. संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली असती तर त्यांचा जीव वाचू शकला असता, परंतु युद्धजन्य परिस्थितीमुळे त्यांना आपत्कालीन आरोग्यसेवा मिळू शकली नाही.

होर्मुजच्या समुद्रात 'लराक आयलंड' खुला, जहाजाच्या प्रवासासाठी तेल कंपनीने मोजले २० लाख डॉलर्स

कुटुंबीयांच्या दिलेल्या माहितीनुसार, कॅप्टन राकेश रंजन सिंह गेल्या महिन्यात २ फेब्रुवारी रोजी आपली रजा पूर्ण करून 'अवाना' जहाजावर रुजू झाले होते. हे जहाज तेल घेण्यासाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीला गेले होते. तेल भरल्यानंतर, हे जहाज १ मार्च रोजी भारताकडे निघाले, परंतु युद्धाच्या परिणामामुळे दुबईपासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर समुद्रात नांगर टाकून थांबले होते.

'अवाना' जहाजावर ३५ कर्मचारी अडकले 

कॅप्टन सिंह यांच्यासह सुमारे ३५ कर्मचारी 'अवाना' जहाजावर होते. ते गेल्या १८ दिवसांपासून समुद्रात अडकले होते. या काळात कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यांना नियमित वैद्यकीय सेवा मिळू शकली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, १८ मार्च रोजी कॅप्टन सिंह यांची प्रकृती अचानक खालावली. जहाजावरील अधिकाऱ्यांनी तात्काळ दुबई एटीसीशी संपर्क साधून एअर अॅम्ब्युलन्सची विनंती केली, पण युद्धजन्य परिस्थितीमुळे परवानगी नाकारण्यात आली. त्यानंतर त्यांना बोटीने दुबईच्या किनाऱ्यावर आणण्यात आले, पण या प्रक्रियेला बराच वेळ लागला. वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांची प्रकृती अधिकच खालावली. अखेरीस हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

Web Title : होर्मुज जलडमरूमध्य में फंसे भारतीय कैप्टन की युद्ध के बीच मौत

Web Summary : होर्मुज जलडमरूमध्य में 'अवाना' जहाज पर 18 दिनों से फंसे कैप्टन राकेश रंजन सिंह का निधन हो गया। युद्ध की स्थिति के कारण समय पर चिकित्सा सहायता नहीं मिल सकी, जिससे उनकी हृदयघात से मृत्यु हो गई। 35 चालक दल के सदस्यों के साथ जहाज क्षेत्रीय संघर्ष के कारण फंसा हुआ था।

Web Title : Indian Captain Dies Stranded in Strait of Hormuz Amidst War

Web Summary : Captain Rakesh Ranjan Singh died after being stranded for 18 days on the 'Awana' ship in the Strait of Hormuz. War conditions hindered timely medical assistance, leading to his death from a heart attack. The ship, carrying 35 crew members, was stuck due to regional conflict.