शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
2
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
3
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
4
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
5
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
7
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
8
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
9
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
10
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
11
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
12
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
13
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
14
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
15
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
16
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
17
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
18
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
19
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
20
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...

चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 02:26 IST

मंगळ व शुक्र ग्रह भारताच्या रडारवर : मोदी; इस्रो-नासाच्या संयुक्त मोहिमेत २९ मे रोजी ‘एक्सिओम-४’चे प्रक्षेपण

नवी दिल्ली : भारत अंतराळ संशोधन क्षेत्रात नव्या विश्वासाने पुढे जात असून, भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह चंद्रावर उमटणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी म्हटले आहे.

जागतिक अंतराळ संशोधन संमेलनात आपल्या रेकॉर्ड केलेल्या संदेशात मोदींनी म्हटले आहे की, संशोधनाच्या मोहिमांमध्ये मंगळ व शुक्रही आमच्या रडारवर आहेत. भारताच्या अंतराळ मोहिमा दुसऱ्यांशी स्पर्धा करण्यासाठी नाहीत. याचा अर्थ एकजुटीने मिळून उंची गाठूया, असा आहे. आम्ही मानवतेच्या भल्यासाठी अंतराळ संशोधन करण्यासाठी मिळून लक्ष्य साध्य करू इच्छित आहोत. 

भारताने दक्षिण आशियायी देशांसाठी एक उपग्रह प्रक्षेपित केला आणि जी-२० देशांच्या अध्यक्षतेच्या कालावधीत घोषित ‘जी-२०’ उपग्रह मोहीम, ग्लोबल साऊथसाठी एक भेट असेल. २०२७ च्या सुरुवातीच्या प्रस्तावित प्रक्षेपणाचा उल्लेख करताना मोदी म्हणाले की, आपली पहिली मानवीय अंतराळ ‘मोहीम गगनयान’ आमच्या देशाच्या वाढत्या अपेक्षा दर्शवते. 

१९६३ पासून आतापर्यंतचा अंतराळ प्रवास उल्लेखनीय आगामी आठवड्यांमध्ये एक भारतीय अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी इस्रो-नासाच्या संयुक्त मोहिमेद्वारे अंतराळाचा प्रवास करणार आहे. ‘एक्सिओम-४’ २९ मे रोजी प्रक्षेपित होणार असून शुभांशु शुक्ला व अन्य तीन जण कक्षीय प्रयोगशाळेत १४ दिवसांचा प्रवास करतील.  अशाच प्रकारे ‘ग्लेक्स २०२५’चे आयोजन आंतरराष्ट्रीय अंतराळ प्रवासी महासंघ व भारतीय अंतराळ संशोधन संघटनेकडून केले जाणार आहे.अंतराळ केवळ साध्य नाही. ते जिज्ञासा, साहस व सामूहिक प्रगतीची घोषणा आहे. २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्थानक संशोधन व जागतिक सहयोगामध्ये नवीन दालन उघडणार आहे. वर्ष २०४० पर्यंत कोणत्याही प्रकारे भारताचे पदचिन्ह चंद्रावर उमटणार आहे. मंगळ व शुक्र आमच्या रडारवर आहेत. १९६३मध्ये एक छोटे रॉकेट लाँच करण्यापासून चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा देश बनण्यापर्यंतचा भारताचा प्रवास उल्लेखनीय आहे.  

टॅग्स :isroइस्रो