अरुणाचलमध्ये भारतीय लष्कराचे चिता हेलिकॉप्टर कोसळले, एक पायलट शहीद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 02:28 PM2022-10-05T14:28:03+5:302022-10-05T14:42:33+5:30

अरुणाचल प्रदेशमध्ये आज बुधवारी भारतीय सेनेच्या चिता हेलिकॉप्टर कोसळले. या घटनेत एका पायलटचा मृत्यू झाला. ही घटना अरुणाचल प्रदेशमधील तवांग येथे घडली.

Indian Army's Cheetah helicopter crashes in Arunachal one pilot martyred | अरुणाचलमध्ये भारतीय लष्कराचे चिता हेलिकॉप्टर कोसळले, एक पायलट शहीद

अरुणाचलमध्ये भारतीय लष्कराचे चिता हेलिकॉप्टर कोसळले, एक पायलट शहीद

Next

इटानगर : अरुणाचल प्रदेशमध्ये आज बुधवारी भारतीय सेनेच्या चिता हेलिकॉप्टर कोसळले. या घटनेत एका पायलटचा मृत्यू झाला. ही घटना अरुणाचल प्रदेशमधील तवांग येथे घडली. या अपघातात मृत्यू झालेल्या पायलटचे नाव लेफ्टनंट कर्नल सौरभ यादव असं आहे. तर हेलिकॉप्टरमधील लेफ्टनंट असलेल्या अन्य पायलटवर उपचार सुरू आहेत.

ही घटना आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. अरुणाचल प्रदेश येथील तवांग जवळ फॉरवर्ड परिसरात घडली. या घटनेनंतर भारतीय सेनेने निवेदन प्रसिद्ध केले आहे. 

या हेलिकॉप्टरमध्ये २ पायलट होते. या अपघातानंतर जवळच्या रुग्णालयात त्यांना दाखल केले. उपचारादरम्यान एका पायलटचा मृत्यू झाला असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. 

 

सुरक्षा दलाने दोन दिवसांनंतरच घेतला बदला, एसपीओंच्या हत्येत सहभागी असलेल्यासह ४ दहशतवादी ठार
 
अरुणाचल प्रदेशचे असलेले केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी ट्विट करून अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. “अरुणाचल प्रदेशातील तवांग जिल्ह्यात भारतीय लष्कराचे चिता हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची दुःखद बातमी येत आहे. जखमी वैमानिकाच्या बचावासाठी प्रार्थना, असं ट्विट त्यांनी केले आहे. 

Web Title: Indian Army's Cheetah helicopter crashes in Arunachal one pilot martyred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.