बातच न्यारी! भारतीय जवान हॉलिवूडच्या स्टंटमननाही पडला भारी; अनोखे वर्ल्ड रेकॉर्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2020 17:32 IST2020-11-10T17:32:03+5:302020-11-10T17:32:35+5:30
Indian Army World Record: सिग्नल ट्रेनिंग सेंटरमध्ये लाँगेस्ट रँप जम्पचा थरार अनुभवण्यात आला. येथे डेअर डेव्हिल्स टीमचे कॅप्टन दिशांत कटारिया यांनी मंगळवारी 65 लोकांच्या वरून बाईक जेव्हा हवेत उडविली तेव्हा तो थरार पाहून साऱ्यांच्याच अंगावर काटे आले.

बातच न्यारी! भारतीय जवान हॉलिवूडच्या स्टंटमननाही पडला भारी; अनोखे वर्ल्ड रेकॉर्ड
जबलपूर येथील सिग्नल ट्रेनिंग सेंटरमध्ये भारतीय लष्कराच्या डेअर डेव्हिल्स टीमने नवीन जागतिक रेकॉर्ड नावावर केले आहे. कॅप्टन दिशांत कटारिया यांनी तब्बल 65 लोकांच्या अंगावरून बाईक उडवत टीमचेच जुने रेकॉर्ड मोडले आहे. कॅप्टनने बाईकवरून 60.4 फूट लांब मोठी उडी घेतली. या आधी 2013 मध्ये डेअर डेव्हिल्स टीमने 44.10 फुटांची उडी घेत नवीन रेकॉर्ड नोंदविले होते.
सिग्नल ट्रेनिंग सेंटरमध्ये लाँगेस्ट रँप जम्पचा थरार अनुभवण्यात आला. येथे डेअर डेव्हिल्स टीमचे कॅप्टन दिशांत कटारिया यांनी मंगळवारी 65 लोकांच्या वरून बाईक जेव्हा हवेत उडविली तेव्हा तो थरार पाहून साऱ्यांच्याच अंगावर काटे आले. त्यांची बाईक 60.4 फुटांपर्यंत हवेतून पुढे जात होती. एखाद्या हॉलिवूडपटाला शोभेल असा हा प्रसंग खऱ्याखुऱ्या हिरोने केला होता.
यानंतर कॅप्टन दिशांत कटारिया यांच्या नावे एक नवीन वर्ल्ड रेकॉर्ड नोंद झाले आहे. ही त्यांची झेप गिनीज बुक, लिम्का बुक, आशिया आणि इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविली जाणार आहे.
2013 मध्ये डेअर डेव्हिल्सचेच कॅप्टन मेजर अभयजीत मेहलावत यांनी 51 लोकांकरून रॅम्प जम्प केले होते. यामध्ये 44.10 फुटांची उडी घेतली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे डेअर डेव्हिल्स टीमने बनविलेले हे 28 वे वर्ल्ड रेकॉर्ड आहे.