Indian Army Video: गर्लफ्रेंड आहे ना? भेटायला सुटी नाही दिली तर मला सांग; आर्मी कमांडर जखमी जवानाला भेटले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 18:51 IST2022-04-15T18:50:57+5:302022-04-15T18:51:55+5:30
इंडियन आर्मीची Chinar Corps ही एक डिव्हिजन आहे. कमांडरनी जखमी जवानाला त्याच्या गर्लफ्रेंडबाबत विचारले. त्याचे उत्तर ऐकून सारे हसू लागले. याचा व्हिडीओ Chinar Corps ने पोस्ट केला आहे.

Indian Army Video: गर्लफ्रेंड आहे ना? भेटायला सुटी नाही दिली तर मला सांग; आर्मी कमांडर जखमी जवानाला भेटले...
काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत चिनार कॉर्पचे काही जवान जखमी झाले होते. एक जवान शहीद झाला. या जखमी जवानांना भेटण्यासाठी आर्मी कमांडर हॉस्पिटलमध्ये पोहोचले. यावेळी त्यांनी या जवानांशी संवाद साधला.
इंडियन आर्मीची Chinar Corps ही एक डिव्हिजन आहे. कमांडरनी जखमी जवानाला त्याच्या गर्लफ्रेंडबाबत विचारले. त्याचे उत्तर ऐकून सारे हसू लागले. याचा व्हिडीओ Chinar Corps ने पोस्ट केला आहे. श्रीनगरमधील हॉस्पिटलमध्ये लष्कराचे अधिकारी गेले होते. तेव्हा जखमी जवानाला त्यांनी तब्येतीबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने बहीणीचे लग्न आहे, तिकडे जायचे आहे असे सांगितले. ही चर्चा होत असतानाच अचानक कमांडरचा प्रश्न आला, बहीणीच्याच लग्नाला जायचेय की गर्लफ्रेंडही आहे.
यावर त्या जवानाने हो, आहे असे उत्तर दिले आणि ती सध्या देहरादूनला असल्याचे सांगितले. तेव्हा कमांडरनी लग्नाला जातोयस तर येताना तिलाही भेटून ये असे सांगितले. याचबरोबर जाता जाता तुला सुटी नाही दिली तर मला सांग, असे सांगताच एकच हशा पिकला.
#ArmyCdrNC visited 92 BH at BB Cantt & inquired about the well-being of patients admitted. He lauded the medical staff for their professionalism. Army Cdr also interacted with jawans of #CRPF admitted owing to operational injuries.#Kashmir@adgpi@NorthernComd_IA@crpfindiapic.twitter.com/XiqzO5RzS7
— Chinar Corps🍁 - Indian Army (@ChinarcorpsIA) April 11, 2022
तत्पूर्वी कमांडरनी आणखी एका जवानाची भेट घेतली होती. त्याला दहशतवाद्यांनी पाठीमागून गोळी झाडली होती. ११ एप्रिलची ही चकमक होती. तेव्हा हे कमांडर त्याला भेटण्यासाठी आले होते. तेव्हा या जवानाने त्या दोघांना मारायचे आहे असे सांगितले होते. तेव्हा त्याला धड बोलताही येत नव्हते. आज कमांडरनी पुन्हा या जवानाची भेट घेतली आणि तू म्हणाला होतास ना, त्यांना आपण मारले, असे सांगितले. तेव्हा सर त्या दहशतवाद्यांनी पाठीमागून वार केला, नाहीतर मीच त्यांना मारले असते असे म्हणाला. या जवानाला कमांडरनी याच जोशमध्ये तू लवकर बरा होशील असे म्हटले.