भारतीय सैन्यानं ३५X३ किमी सीमेत आखली लक्ष्मण रेषा; चीन, पाकिस्तानचे ड्रोन दिसताच पाडणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 12:58 IST2026-01-27T12:58:26+5:302026-01-27T12:58:48+5:30
भारतीय सैन्याने रॉकेट फोर्ससाठी २ यूनिट याआधीच तैनात केल्या आहेत. त्याशिवाय २१ रुद्र ब्रिगेड, २१ भैरव बटालियनही तैनात केली आहे.

भारतीय सैन्यानं ३५X३ किमी सीमेत आखली लक्ष्मण रेषा; चीन, पाकिस्तानचे ड्रोन दिसताच पाडणार
नवी दिल्ली - भारतीय सैन्यानं उत्तर आणि पश्चिमेकडील सीमांच्या आसपास शत्रूच्या ड्रोनवर नजर ठेवून त्याला तातडीने पाडण्याची जबाबदारी सांभाळली आहे. सीमेच्या ३५ किलोमीटर परिसरात ३ किमीपर्यंत उंचीवर जर एखाद्या शत्रूचे ड्रोन घुसखोरी करत असेल तर त्याच्यावर सैन्याकडून कारवाई केली जाते. भारतीय सैन्याने हे पाऊल देशाच्या पश्चिम आणि उत्तरेकडील सीमांवर घुसखोरी आणि हेरगिरी करणाऱ्या शत्रू ड्रोनच्या वाढत्या हालचाली याविरोधात उचलले आहे.
सैन्यानं बनवलं एअर कमांड कंट्रोल सेंटर
भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरनंतर त्यांच्या धोरणात्मक बाबींमध्ये बदल केले आहेत. त्यात रॉकेट रेजिमेंट बनवण्यात आली आहे. भारतीय सैन्य जमिनीवरील ३५ किमी आणि हवाई सीमेतील ३ किमी अंतरावरील ९७ टक्के ड्रोन आणि एंट्री ड्रोन एक्टिविटीची जबाबदारी घेतली आहे. पाकिस्तानशी जोडलेली पश्चिमेकडील सीमा आणि उत्तरेकडील चीनच्या सीमेलगत सैन्याने एअर कमांड आणि कंट्रोल सेंटर उभारले आहे.
एअर कमांड आणि कंट्रोल सेंटर ना केवळ शत्रूच्या ड्रोनवर नजर ठेवणार तर आपलेही ड्रोन उडवणार आहे. भारतीय सैन्याला पाकिस्तानी सीमेजवळ १० हजार ड्रोन तैनात करू इच्छिते तर चीन सीमेजवळील ३४८८ किमी लांब एलएसीवर २० हजाराहून अधिक ड्रोन सज्ज ठेवायचे आहेत. भारतीय सैन्य हवाई दलाच्या कमांडरसोबत ताळमेळ ठेवून हे काम करत आहे. भारतीय सैन्याची ही तयारी ऑपरेशन सिंदूरनंतर केली आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानी सैन्याने तुर्की आणि चिनी बनावटीचे ड्रोन वापरून भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला होता.
दरम्यान, भारतीय सैन्याने रॉकेट फोर्ससाठी २ यूनिट याआधीच तैनात केल्या आहेत. त्याशिवाय २१ रुद्र ब्रिगेड, २१ भैरव बटालियनही तैनात केली आहे. सीमेजवळ आर्टिलरी ब्रिगेडची रेंजही १५० किमी वाढवून १ हजार किमी केली गेली आहे. चीनच्या वाढत्या हालचालींमुळे रॉकेट फोर्स बनवण्यात आले आहे. पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीनंतर रॉकेट रेजिमेंट तयार केली होती.