शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

पाकिस्तानी सैन्याच्या माऱ्यात भारतीय लष्कराचा एक अधिकारी शहीद, आठवडाभरातील दुसरी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 04:05 IST

पाकिस्तानी सैनिकांनी नियंत्रण रेषेवरील कलसियान, खांगेर, भवानी या भागातील भारतीय लष्कराच्या चौक्यांवर मारा केला.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील राजौरी क्षेत्रातील केरी भागामध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैनिकांनी बुधवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन मारा केला. त्यामध्ये भारतीय लष्कराचे राजेशकुमार हे अधिकारी शहीद झाले. या आठवडाभरात पाकिस्तानच्या माºयामध्ये भारतीय लष्करी अधिकारी शहीद होण्याची ही दुसरी घटना आहे.पाकिस्तानी सैनिकांनी नियंत्रण रेषेवरील कलसियान, खांगेर, भवानी या भागातील भारतीय लष्कराच्या चौक्यांवर मारा केला. त्यात गंभीर जखमी झालेल्या राजेशकुमार या लष्करी अधिकाºयाला तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र ते मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. राजेशकुमार भारतीय लष्करात ज्युनिअर कमिशन्ड आॅफिसर (जेसीओ) पदावर कार्यरत होते.याआधी पाकिस्तानी सैनिकांनी ३० आॅगस्ट रोजी शस्त्रसंधीचे उल्लंघन करून जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यालगतच्या नियंत्रण रेषेवर मारा केला होता. त्यामध्ये भारतीय लष्करातील एक अधिकारी शहीद झाले होते. त्यानंतर तीन दिवसांनी पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचा भंग करत भारतीय हद्दीत मारा केला. यावेळी त्यांनी राजौरी क्षेत्रातील चौक्यांना लक्ष केले. गेल्या वर्षभरात पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून भारतीय हद्दीत गोळीबार किंवा उखळी तोफांचा मारा करण्याचे काही प्रकार घडले आहेत असे भारतीय लष्कराच्या सूत्रांनी सांगितले. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम भारताने रद्द केले. तसेच जम्मू-काश्मीरपासून लडाख वेगळा केला. जम्मू-काश्मीर व लडाख यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला.भारताच्या या कृतीचा राग आलेल्या पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप कांगावा केला पण त्याला प्रमुख देशांनी भीक घातली नाही.भारताविरोधात कुरापती सुरूचकाश्मिरी लोकांच्या पाठीमागे आम्ही उभे आहोत असा देखावा निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे इम्रान खान सरकार सतत भारताच्या कुरापती काढत असते. काश्मीर सीमेवर पाकिस्तानी लष्कर शस्त्रसंधीचे उल्लंघन करून भारतीय हद्दीत मारा करत असल्याचे घडणारे प्रकार हा त्याचाच भाग आहे.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानIndiaभारतPakistanपाकिस्तान