शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

लडाखच्या LACवर चीनच्या हालचालींवर 'भारत' ड्रोनच्या मदतीनं ठेवणार नजर; जाणून घ्या खासियत 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 12:14 PM

सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण संशोधन व विकास संघटने(DRDO)ने पूर्वेकडील लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषे(LAC)च्या बाजूने उंचच उंच भागात आणि डोंगराळ भागात देखरेखीसाठी स्वदेशी बनावटीचे ड्रोन विकसित केले आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला, त्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव कमालीचा वाढला आहे. चीन सातत्यानं इंच इंच जमीन बळकावून विस्तारवादी धोरणाचा अवलंब करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतानंही चीनच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन तैनात केले आहेत. सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण संशोधन व विकास संघटने(DRDO)ने पूर्वेकडील लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषे(LAC)च्या बाजूने उंचच उंच भागात आणि डोंगराळ भागात देखरेखीसाठी स्वदेशी बनावटीचे ड्रोन विकसित केले आहेत. संरक्षण सूत्रांनी एएनआयला सांगितले की, "पूर्व लडाख भागातील सुरू असलेल्या वादावर अचूक पाळत ठेवण्यासाठी भारतीय लष्कराला ड्रोनची आवश्यकता आहे. त्यासाठी डीआरडीओने त्यांना भारत ड्रोन उपलब्ध करून दिले आहेत."डीआरडीओच्या चंदीगड येथील प्रयोगशाळेने विकसित केलेले भारत ड्रोन हे जगातील सर्वात चपळ आणि हलके वजनदार पाळत ठेवणा-या ड्रोनच्या यादीत समाविष्ट होऊ शकतात. डीआरडीओच्या सूत्रांनी सांगितले की, "तरीही लहान शक्तिशाली ड्रोन कोणत्याही स्थानावर मोठ्या अचूकतेसह स्वायत्तपणे काम करतात. प्रगत तंत्रज्ञानासह युनिबॉडी बायोमिमेटिक डिझाइन सर्विलान्ससह हे एक प्राणघातक शस्त्र आहे.ड्रोन कृत्रिम बुद्धिमत्तेने सुसज्ज असून, जे मित्र आणि शत्रू शोधण्यात आणि त्यानुसार कारवाई करण्यास मदत करतात. ड्रोन अतिथंड हवामान आणि तापमानात टिकून राहू शकतात, हे खराब हवामानासाठी देखील विकसित केले जात आहे. ड्रोन संपूर्ण मिशनमध्ये रिअल टाइम व्हिडिओ प्रसारित करते आणि रात्रीच्या दृष्टीने पाहण्याची चांगली क्षमता असलेले हे ड्रोन दाट जंगलात लपलेल्या लोकांना शोधू शकते. हे जंगलातील लोकांच्या हालचालींनाही योग्य टिपण्याचं काम करते. हे ड्रोन अशा प्रकारे तयार केले गेले आहे की ते रडारलादेखील सापडणार नाहीत.

हेही वाचा

म्युच्युअल फंडाची जबरदस्त योजना; रातोरात वाढणार संपत्ती, जाणून घ्या...

चीनमधून बाहेर पडणाऱ्या जपानी कंपन्या भारतात येण्याच्या तयारीत; UPमध्ये मोठा रोजगार उपलब्ध होणार

कार अन् बाइक Insuranceशी संबंधित नियम बदलणार, १ ऑगस्टपासून लागू होणार

UPPCLमध्ये बंपर भरती; १०वी पासही करू शकतात अर्ज, थेट सातव्या आयोगानुसार मिळणार पगार

फक्त बँकाच नव्हे, तर 'या' कंपन्यांनाही मोदी सरकार विकण्याच्या तयारीत; असा आहे 'प्लॅन'

देशात राहणार आता फक्त ५ सरकारी बँका; मोदी सरकार भागीदारी विकणार

आनंदवार्ता! परीक्षेशिवाय मिळणार नोकरी; कोर्टात निघाली भरती

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावDRDOडीआरडीओ