शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने मोठा कट उधळला! लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 10:22 IST

Jammu Kashmir: सफरचंदाच्या बागेत लपलेले दहशतवादी, दारूगोळा जप्त, IED बॉम्ब केला निकामी

Jammu Kashmir terrorist arrested : जम्मू-काश्मीरमध्ये हायब्रिड दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. लष्कर-ए-तैय्यबाशी संबंधित तिघांसह एकूण पाच दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी गेल्या २४ तासांत काश्मीर खोऱ्यात एकाच वेळी चार यशस्वी दहशतवादविरोधी कारवाया केल्या आहेत. पोलिसांनी दावा केला आहे की, शुक्रवारी मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील पाखरपोरा भागात एका हायब्रिड दहशतवादी आणि त्यांच्या साथीदाराला साथीदारांसह अटक करण्यात आली.

या भागात झाली कारवाई

पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळख तनवीर अहमद भट, कारापोरा चरार-ए-शरीफ येथील रहिवासी असून, तो सक्रिय हायब्रिड दहशतवादी आहे. कारापोरा चरार-ए-शरीफ येथील यावर मकबूल गनई असे त्याच्या साथीदाराचे नाव आहे. श्रीनगर जिल्ह्यात, आणखी एका संकरित दहशतवाद्याला हँडग्रेनेडसह अटक करण्यात आली, त्यानंतर आज लाल चौक परिसरात पोलीस आणि सुरक्षा दलांनी अलर्ट मोडमध्ये राहण्यास सांगितले आहे. दुसऱ्या एका कारवाईत पोलिसांनी दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात लष्कर-ए-तैय्यबा संघटनेच्या दोन दहशतवाद्यांच्या साथीदाराला अटक केल्याचा दावा केला आहे.

सफरचंदाच्या बागेत लपलेले दहशतवादी, दारूगोळा आणि आक्षेपार्ह साहित्य जप्त

पोलिसांनी सांगितले की, विशिष्ट गुप्तचर सूचनांवर कारवाई करून, पुलवामा पोलिसांनी गुडुरा पुलवामा येथील सफरचंद बागांमध्ये कसून शोध मोहीम राबवली. शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांच्या दोन साथीदारांना पकडण्यात आले. सुहेल फिरदौस रा. महरादपोरा उत्तरपोरा पुचाल आणि शाहिद गुल रहिवासी वागम पुलवामा अशी त्यांची नावे आहेत. ते म्हणाले की, दोन्ही आरोपी हे प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाशी संबंधित सक्रिय दहशतवादी आकिब शेर-गोजरीचे दहशतवादी सहकारी आहेत आणि दहशतवादी आकिब शेर-गोजरी यांच्यासोबत पुलवामामध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा कट रचला असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यांच्या ताब्यातून शस्त्रे, दारूगोळा आणि आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आल्याचे पोलिस प्रवक्त्याने सांगितले.

आयईडी निकामी

दरम्यान, सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने उत्तर काश्मीरमधील कुपवाडा येथील लादेरवान भागात आयईडी (इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस) बॉम्ब जप्त केला, बीडीएसला बोलावण्यात आले आणि कोणत्याही हानीशिवाय आयईडी नष्ट करण्यात आला.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादterroristदहशतवादीIndian Armyभारतीय जवान