Agniveer Recruitment: अग्निवीर भरतीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू; आठवी उत्तीर्ण उमेदवारांसाठीही सुवर्णसंधी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 12:29 IST2026-02-14T12:26:12+5:302026-02-14T12:29:12+5:30
Indian Army Agniveer Recruitment 2026:देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या तरुण-तरुणींसाठी आनंदाची बातमी आहे.

Agniveer Recruitment: अग्निवीर भरतीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू; आठवी उत्तीर्ण उमेदवारांसाठीही सुवर्णसंधी!
देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या तरुण-तरुणींसाठी भारतीय सैन्याने आनंदाची बातमी दिली आहे. भारतीय सैन्यातर्फे 'अग्निवीर' भरतीसाठी अधिकृत अधिसूचना (Notification) जारी करण्यात आली असून, देशभरातून २५,००० हून अधिक रिक्त पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. विशेष म्हणजे, या भरतीमध्ये अविवाहित पुरुष आणि महिला अशा दोन्ही उमेदवारांना सहभागी होता येणार आहे. या भरती अंतर्गत अग्निवीर जनरल ड्यूटी (GD), अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर लिपिक (Clerk) / स्टोअर कीपर टेक्निकल (SKT) आणि अग्निवीर ट्रेड्समन (८वी आणि १०वी उत्तीर्ण) जागा भरल्या जाणार आहे.
उमेदवारांची निवड दोन टप्प्यांत होणार आहे. उमेदवारांना सर्वप्रथम सर्व उमेदवारांना संगणक-आधारित ऑनलाइन परीक्षा द्यावी लागेल. ही परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित असेल. त्यानंतर ऑनलाइन परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. पात्र उमेदवारांना शारीरिक चाचणी आणि भरती रॅलीसाठी बोलावले जाईल. महत्त्वाचे म्हणजे, लिपिक आणि स्टोअरकीपर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना टायपिंग चाचणी देणे अनिवार्य आहे. यामध्ये इंग्रजी टायपिंगचा वेग प्रति मिनिट किमान ३० शब्द असणे आवश्यक आहे.
कोणाला अर्ज करता येईल?
| पद | शैक्षणिक पात्रता | गुणांची अट |
| जनरल ड्यूटी (GD) | १० वी उत्तीर्ण | एकूण ४५ टक्के आणि प्रत्येक विषयात ३३ टक्के गुण आवश्यक |
| टेक्निकल | १२ वी (विज्ञान - PCM) किंवा १० वी + ITI | १२ वी मध्ये ५० टक्के गुण किंवा २ वर्षांचा ITI कोर्स |
| लिपिक / SKT | १२ वी (कोणतीही शाखा) | एकूण ६० टक्के गुण. इंग्रजी व गणित विषयात किमान ५० टक्के गुण अनिवार्य |
| ट्रेड्समन | ८ वी किंवा १० वी उत्तीर्ण | प्रत्येक विषयात किमान ३३% गुण आवश्यक |
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी भारतीय सैन्याच्या अधिकृत पोर्टलला भेट देऊन आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे. वेळेत अर्ज करून तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.