शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

Indian Air Strike on Pakistan: वायुदलाची धाडसी कामगिरी; अजित डोवालांनी सांगितली एअर स्ट्राइकची ए बी सी डी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 10:36 PM

अवघ्या 21 मिनिटांत हवाई दलाकडून 300 दहशतवाद्यांचा खात्मा

नवी दिल्ली: भारतीय हवाई दलानंपाकिस्तानच्या बालाकोटमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. मध्यरात्री तीन ते साडेतीनच्या दरम्यान हवाई दलानं धाडसी कारवाई करत जैश-ए-मोहम्मदला दणका दिला. नियंत्रण रेषा ओलांडून कारवाई करत भारतानं 12 दिवसांपूर्वी पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. यानंतर कॅबिनेटच्या सुरक्षा समितीची बैठक झाली. यावेळी समितीच्या सदस्यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी कारवाईची संपूर्ण माहिती दिली. कॅबिनेटच्या सुरक्षा समितीच्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन, अर्थ मंत्री अरुण जेटली, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हवाई दलाच्या धडाकेबाज कारवाईत जैशचे 25 टॉप कमांडर मारले गेल्याचं डोवाल यांनी समिती सदस्यांना सांगितलं. 'भारतीय हवाई दलाच्या एअर स्ट्राइकमध्ये जैशचे बहुतांश टॉप कमांडर मारले गेले. त्यामुळे या हल्ल्यात जैशचं मोठं नुकसान झालं,' अशी माहिती त्यांनी दिली.बालाकोट जैशचा सुरक्षित बालेकिल्ला समजला जातो. हा भाग चहूबाजूंनी जंगलांनी वेढलेला आहे. जैशचा सुरक्षित तळ मानला जाणारा बालकोट उद्ध्वस्त झाल्यानं जैशला हादरा बसला. हा तळ साधासुधा नव्हता, असं अजित डोवाल समितीच्या बैठकीत म्हणाले. 'नष्ट करण्यात आलेल्या दहशतवादी तळावर फायरिंग रेंज, स्फोटक परीक्षण सुविधा, प्रशिक्षकांसाठी वातानुकूलित कार्यालयं होती. याशिवाय या तळावर स्विमिंग पूल, मनोरंजन केंद्र यासारख्या सोयीदेखील होत्या. पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयकडून या सुविधा पुरवल्या जात होत्या,' अशी महत्त्वपूर्ण माहिती डोवाल यांनी दिली. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादी तळांवर मोठ्या संख्येनं भरती सुरू होती, असं डोवाल म्हणाले. 'भारताच्या हल्ल्यात जैशचे दहशतवादी, प्रशिक्षक, टॉप कमांडर आणि जिहादी मारले गेले. या ठिकाणी आत्मघाती हल्ले घडवण्याच्या तयारीत असलेल्या 42 जणांना प्रशिक्षण देण्यात येत होतं. याबद्दलची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली. यानंतर या भागातील सूत्रांच्या मदतीनं अधिकची माहिती मिळवल्यानंतर हवाई दलानं गुप्तचर विभागाच्या मदतीनं दहशतवादी तळांवर जोरदार हल्ले चढवले,' अशी माहिती डोवाल यांनी दिली.  

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकindian air forceभारतीय हवाई दलAjit Dovalअजित डोवालNarendra Modiनरेंद्र मोदीJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदPakistanपाकिस्तानNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनSushma Swarajसुषमा स्वराजRajnath Singhराजनाथ सिंहArun Jaitleyअरूण जेटली