हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले; पायलट सुखरुप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 13:21 IST2019-01-28T13:21:10+5:302019-01-28T13:21:54+5:30

उत्तर प्रदेशातील कुशीनगरमध्ये हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळल्याची दुर्घटना सोमवारी दुपारी घडली. 

Indian Air Force's Jaguar fighter jet crashed in Uttar Pradesh's Kushinagar | हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले; पायलट सुखरुप

हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले; पायलट सुखरुप

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील कुशीनगरमध्ये भारतीय हवाई दलाचे जॅग्वार हे लढाऊ विमान कोसळल्याची दुर्घटना सोमवारी दुपारी घडली. 

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय हवाई दलाचे जॅग्वार विमानाने गोरखपूर येथील हवाई दलाच्या तळावरून उड्डाण घेतले. त्यानंतर 10 मिनिटानंतर पायलटचा संपर्क तुटला आणि येथील कुशीनगरमधील हेतिमपूर गावातील शेतात हे विमान कोसळले. दरम्यान, विमान कोसळण्यापूर्वी पायलटने पॅराशूटच्या मदतीने उडी मारल्याने सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे.  घटनास्थळी ग्रामस्थांनी गर्दी केली आहे. तसेच, पोलीस दाखल झाले आहेत. 



भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील जॅग्वार हे एक प्रमुख लढाऊ विमान आहे. 



 

Web Title: Indian Air Force's Jaguar fighter jet crashed in Uttar Pradesh's Kushinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.