शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
4
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
5
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
6
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
7
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
8
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
9
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
10
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
12
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
13
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
14
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
15
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
16
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
17
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
18
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?

'भारत आता मुस्लीम लीगच्या मानसिकतेने चालणार नाही'; योगी आदित्यनाथांनी संभलबद्दल सोडलं मौन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 19:29 IST

संभलमधील जामा मशि‍दीचा वाद देशभरात चर्चेत आहे. याच मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी वेगळी भूमिका मांडली होती. त्यावर आता योगी आदित्यनाथ यांनी भाष्य केले आहे. 

Yogi Adityanath News: आमचा जुना वारसा परत मिळवणे ही वायफळ गोष्ट नाहीये, असे म्हणत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संभलमधील वादावर मौन सोडले. ज्या मालमत्तांवर वक्फ बोर्डाकडून दावे केले जात आहेत, त्यावर योगी आदित्यनाथ यांनी भाष्य केले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

संभलमधील शाही जामा मशि‍दीच्या ठिकाणी पूर्वी मंदिर होते, असा दावा केला गेला. त्यामुळे कोर्टाने या मशि‍दीचे सर्वे करण्याचे आदेश दिले. त्यानंतर वाद चिघळला. सध्या प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी असे मुद्दे आता काढू नये, असे म्हटले होते. त्यानंतर आता योगी आदित्यनाथ यांनी भूमिका मांडली आहे. 

योगी आदित्यनाथ काय बोलले?

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आजतक या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संभलमधील जागेच्या वादावर भूमिका मांडली. 

आदित्यनाथ म्हणाले, "जुना वारसा परत मिळवणे, ही वाईट गोष्ट नाहीये. संभलमध्ये सनातन धर्माशी संबंधित अनेक पुरावे मिळाले आहेत. भारत आता मुस्लीम लीगच्या मानसिकतेने चालणार नाही."

शाही जामा मशि‍दीच्या सर्वे वेळी झालेल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावर जोर देत योगी आदित्यनाथ म्हणाले की, पुराणांमध्ये कल्किचे जन्मस्थान संभल सांगितले गेले आहे. कल्कि हा हिंदूंचे ईश्वर भगवान विष्णुंचा १०वा अवतार मानला जातो. 

'संभलमधील हरिहर मंदिर पाडून...'

"वर्ष १५९६ मध्ये संभलमध्ये एक हरिहर मंदिर तोडून, एक बांधकाम करण्यात आले होते. त्याचा उल्लेख आइन ए अकबरी असाही केलेला आहे", असे योगी आदित्यनाथ म्हणाले. 

काही दिवसांपूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंदिर-मशीद मुद्दे आता उचलू नयेत, असे म्हटले होते. पुण्यात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी अयोध्येमध्ये राम मंदिर झाले. ती सर्वांची इच्छा होती. पण, दररोज असे नवीन मुद्दे उकरून काढणे स्वीकारार्ह नाही, असे मत त्यांनी मांडले होते. त्यानंतर आता योगींनी केलेल्या विधानाची चर्चा सुरू झाली आहे. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशMosqueमशिदRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ