''रजनीकांत पंतप्रधान झाल्यास भारत अमेरिकेप्रमाणे महाशक्ती बनेल''

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 19:32 IST2018-02-07T18:53:05+5:302018-02-07T19:32:17+5:30

जगातील जवळपास 200 देशांपैकी भारताच्या स्थितीबाबत बोलायचं झाल्यास जेव्हा सुपरस्टार रजनीकांत भारताचे पंतप्रधान बनतील तेव्हाच भारत अमेरिकेप्रमाणे महाशक्ती बनेल

India will become america when rajinikanth becomes pm says ram gopal varma | ''रजनीकांत पंतप्रधान झाल्यास भारत अमेरिकेप्रमाणे महाशक्ती बनेल''

''रजनीकांत पंतप्रधान झाल्यास भारत अमेरिकेप्रमाणे महाशक्ती बनेल''

मुंबई : चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक राम गोपाल वर्मा नेहमीच आपल्या विविध विधानांमुळे चर्चेत असतात.  अशाच एका विधानामुळे वर्मा सध्या चर्चेत आहेत. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत जेव्हा भारताचे पंतप्रधान बनतील तेव्हा भारत अमेरिकेप्रमाणे महाशक्ती बनेल असं वर्मा म्हणाले आहेत. 

''जगातील जवळपास 200 देशांपैकी भारताच्या स्थितीबाबत बोलायचं झाल्यास जेव्हा सुपरस्टार रजनीकांत भारताचे पंतप्रधान बनतील तेव्हाच भारत अमेरिकेप्रमाणे महाशक्ती बनेल'' असं ट्विट स्वतः राम गोपाल वर्मा यांनी सोमवारी केलं आहे. 



गेली दोन दशकं रजनीकांत यांच्या राजकारण प्रवेशाची चर्चा होती. अखेर, 31 डिसेंबर रोजी चेन्नई येथील राघवेंद्र कल्याण मंडप इथं रविवारी सकाळी त्यांनी समर्थकांच्या उपस्थितीत राजकारण प्रवेशाची घोषणा केली.तामिळनाडू विधानसभेच्या सर्व 234 जागा त्यांचा पक्ष लढवणार आहे. 

Web Title: India will become america when rajinikanth becomes pm says ram gopal varma