भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 05:34 IST2025-10-24T05:32:51+5:302025-10-24T05:34:27+5:30
संरक्षण खात्याने युद्धक्षमता वाढवण्याच्या उद्देशाने शस्त्रास्त्र व लष्करी हार्डवेअर खरेदीच्या प्रस्तावांना मंजुरी दिली. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर खरेदीबाबतचा हा दुसरा मोठा निर्णय आहे.

भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: संरक्षण खात्याने तिन्ही दलांची युद्धक्षमता वाढवण्याच्या उद्देशाने सुमारे ७९ हजार कोटी रुपयांच्या शस्त्रास्त्र व लष्करी हार्डवेअर खरेदीच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. यात नाग क्षेपणास्त्र, पाणी व जमिनीवर चालणाऱ्या युद्धनौका, इलेक्ट्रॉनिक हेरगिरी व टेहळणी करणारी अद्ययावत उपकरणे यांचा समावेश आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर खरेदीबाबतचा हा दुसरा मोठा निर्णय आहे. यापूर्वी, ५ ऑगस्ट रोजी ६७,००० कोटी रुपयांच्या खरेदी प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेच्या बैठकीत या खरेदी प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.
नौदल खरेदी: लँडिंग प्लॅटफॉर्म, ३० मिमी नौदल तोफा, आधुनिक हलके टॉर्पेडो, इलेक्ट्रो ऑप्टिकल इन्फ्रा रेड सर्च अँड ट्रॅक सिस्टिम, दारुगोळा.
भूदल खरेदी: नाग क्षेपणास्त्र एमके-११ प्रणाली, मोबाइल इलेक्ट्रॉनिक हेरगिरी प्रणाली, उच्चप्रतीची गतीशील वाहने.
हवाई दल खरेदी: 'कोलॅबोरेटिव्ह लाँग रेंज टार्गेट सॅचुरेशन/डिस्ट्रक्शन सिस्टिम' व अन्य यंत्रणांची खरेदी.