शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

'त्या करारात नेमकं काय, कळायला हवं', भारत-अमेरिका ट्रेड डीलवर शशी थरूर स्पष्ट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 14:47 IST

India-US Trade Deal: अमेरिकेने भारतावर लादलेला 50 टक्के कर, 18 टक्क्यांवर आणला आहे.

India-US Trade Deal: बहुप्रतिक्षित भारत-अमेरिका ट्रेड डील जाहीर झाल्यानंतर विरोधकांकडून यावर टीका आणि प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, काँग्रेस नेते शशि थरूर यांनी या करारावर संतुलित प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय वस्तूंवरील कर 50 टक्क्यांवरून थेट 18 टक्क्यांपर्यंत कमी केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच, गुंतवणूक आणि निर्बंधांबाबत काही महत्त्वाचे सवालही उपस्थित केले आहेत.

टॅरिफ कमी होणे चांगली बाब, पण...

शशि थरूर म्हणाले, त्या करारात नेमकं काय आहे, हे मला जाणून घ्यायचे आहे. विरोधी पक्ष फक्त स्पष्टता मागत आहे. करारात काय, हेच आम्हाला माहीत नाही. आपल्याकडे फक्त ट्रम्प आणि पीएम मोदींचे ट्विट आहे. संसदीय लोकशाहीत हे पुरेसे आहे का? भारत सरकारने देशातील जनतेला या करारात काय आहे, हे समजावून सांगितले पाहिजे की नाही? या करारात नेमकं काय आहे, हे पूर्णपणे समजल्यावरच आपण खऱ्या अर्थाने आनंद व्यक्त करू शकतो. मात्र कर 50 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात आला, ही नक्कीच चांगली बाब आहे.

गुंतवणुकीवर आणि निर्बंधांवर शंका

थरूर पुढे म्हणाले, ट्रम्प म्हणतात की हा करार शेतीसाठी आहे, मग भारतीय शेतकऱ्यांना काय मिळणार? डोनाल्ड ट्रम्प 500 अब्ज डॉलरची गुंतवणूक होईल, असे सांगत आहेत. मात्र हा पैसा नेमका येणार कुठून? आपली संपूर्ण आयात 700 अब्ज डॉलर्स आहे. मग आपण इतर सर्व देशांकडून खरेदी करणे थांबवणार आहोत का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

एनडीएचा जल्लोष, मोदींचा दावा... 

दरम्यान, ट्रेड डीलच्या घोषणेनंतर संसदेत एनडीए नेत्यांनी जल्लोष केला. संसदीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यात आले. या बैठकीत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, हा करार आमच्या कूटनीतीचा मोठा विजय आहे. यावरून हे सिद्ध होते की, संयम ठेवला तर त्याचे फळ नक्की मिळते.

काय आहे भारत-अमेरिका करार?

या करारानुसार, अमेरिकेने भारतीय वस्तूंवरील एकूण टॅरिफ 50 टक्क्यांवरून 18 टक्क्यांपर्यंत कमी केले आहेत. तसेच, रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे लावण्यात आलेला 25 टक्के दंडात्मक टॅरिफही हटवण्यात आला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मते, भारत भविष्यात रशियाकडून तेल खरेदी कमी करेल किंवा थांबवेल आणि त्याऐवजी अमेरिका व व्हेनेझुएलाकडून तेल आणि गॅस खरेदी वाढवेल.

भारताकडून 500 अब्ज डॉलरच्या खरेदीची तयारी

या करारांतर्गत भारताने पुढील काही वर्षांत अमेरिकेकडून ऊर्जा (कोळशासह), तंत्रज्ञान, कृषी उत्पादने यांची 500 अब्ज डॉलरपेक्षा अधिक खरेदी करण्याचा संकल्प केला आहे. या ट्रेड डीलमुळे रत्न-आभूषण, वस्त्रोद्योग, औषधनिर्माण (फार्मा) आणि ऑटोमोबाईल क्षेत्राला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Shashi Tharoor: India-US trade deal, good but clarity needed.

Web Summary : Shashi Tharoor cautiously welcomes the India-US trade deal's tariff reductions. He seeks clarity on investment details and implications for Indian farmers, questioning the deal's overall benefits.
टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरIndiaभारतAmericaअमेरिकाbusinessव्यवसायDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पNarendra Modiनरेंद्र मोदी