भारत-अमेरिका मैत्री चीनची डोकेदुखी बनली, 'या' एका डीलनं ड्रॅगनची झोप उडवली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2023 16:50 IST2023-06-25T16:49:19+5:302023-06-25T16:50:13+5:30
याच बरोबर, आपण चीनच्या बाबतीत पूर्णपणे सतर्क आहोत आणि आपल्या पद्धतीने कारवाईही सुरू आहे, हेही मोदींनी विरोधकांना दाखवून दिले आहे.

भारत-अमेरिका मैत्री चीनची डोकेदुखी बनली, 'या' एका डीलनं ड्रॅगनची झोप उडवली!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा नुकताच पार पडला. भारताने अमेरिकेसोबत डिफेन्सपासून ते चिप टेक्नोलॉजीपर्यंत अनेक करारावर स्वाक्षरी केली. यामुळे चीनची डोकेदुखी वाढली आहे. याच बरोबर, आपण चीनच्या बाबतीत पूर्णपणे सतर्क आहोत आणि आपल्या पद्धतीने कारवाईही सुरू आहे, हेही मोदींनी विरोधकांना दाखवून दिले आहे.
खरे तर, अमेरिका आणि भारत यांच्यात बरेच करार झाले आहेत. मात्र, टेलीकॉम सेक्टरसंदर्भात दोन्ही देशांमध्ये एक अअसा करार झाला आहे, ज्यामुळे चीनलाही धक्का बसला आहे. महत्वाचे म्हणजे, ज्या टेलीकॉम टेक्नॉलॉजीवर अमेरिका आणि भारत यांच्यात सहमती झाली, त्यात चीनला जागतिक पातळीवर महारथी मानले जाते.
भारत आणि अमेरिकेने टेलीकॉम क्षेत्रातील चीनचे वर्चस्व नष्ट करण्याची योजना आखली आहे. या योजनेअंतर्गत दोन्ही देशांनी एकत्रितपणे ओपन रेडिओ अॅक्सेस नेटवर्कवर करार केला आहे. या कराराचा अथवा डीलचा मुख्यउद्देश मोबाइल नेटवर्कमध्ये वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरला इंटरऑपरेटची फॅसिलिटी देणे, हा आहे.
महत्वाचे म्हणजे यात कुणीही विक्रेता असू शकतो. जगातील अनेक देश यावर काम करत आहेत. या करारामुळे यूएस आणि भारतासारख्या देशात मल्टी-व्हेंडर नेक्स्ट जनरेशन टेलिकॉम सोल्यूशन डेव्हलप करण्यास मदत मिळू शकते आणि यामुळे दोन्ही देशातील कंपन्यांना फायदा मिळेल. सध्या ज्या 4जी, 5जी आणि 6जी टेक्नॉलॉजीमध्ये चीन आणि काही युरोपीयन देशांचा दबदबा बघायला मिळत आहे. त्यात भारताचाही समावेश होईल आणि यामुळे चीनसोबतच्या स्पर्धेत मोठी मदत मिळेल.