भारताकडून निर्भय क्षेपणास्त्राची चाचणी, एक हजार किलोमीटरपर्यंतच्या शत्रूंच्या ठिकाणांना करणार नेस्तनाबूत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2017 07:08 PM2017-11-07T19:08:23+5:302017-11-07T19:10:34+5:30

ओडिशा- भारतानं स्वदेशी बनावटीची आणि दूरपर्यंत मारा करणारी सुपर सॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे.

India test-fired missile test, destroying thousands of kilometers of enemy space | भारताकडून निर्भय क्षेपणास्त्राची चाचणी, एक हजार किलोमीटरपर्यंतच्या शत्रूंच्या ठिकाणांना करणार नेस्तनाबूत

भारताकडून निर्भय क्षेपणास्त्राची चाचणी, एक हजार किलोमीटरपर्यंतच्या शत्रूंच्या ठिकाणांना करणार नेस्तनाबूत

googlenewsNext

ओडिशा- भारतानं स्वदेशी बनावटीची आणि दूरपर्यंत मारा करणारी सुपर सॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे(डीआरडीओ)नं विकसित केलेल्या या क्षेपणास्त्राची ही पाचवी चाचणी होती. डीआरडीओ सूत्रांच्या माहितीनुसार, अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज असलेल्या या क्षेपणास्त्राचं चांदीपूरच्या चाचणी केंद्रावरून सकाळी 11 वाजून 20 मिनिटांनी प्रक्षेपण करण्यात आलं. संरक्षण तज्ज्ञांनी पाचव्यांदा घेतलेल्या या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी ठरण्याचा दावा केला आहे.

डीआरडीओच्या संशोधकांनी प्रक्षेपणानंतर चाचणीच्या सुरुवातीच्या प्रक्रिया सुरळीत झाल्याचं म्हटलं आहे. सध्या तरी ट्रॅकिंग प्रणालीच्या माध्यमातून क्षेपणास्त्राबाबत माहिती गोळा केली जात आहे. या क्षेपणास्त्राची 2013मध्ये पहिल्यांदा चाचणी घेण्यात आली होती. त्यावेळी ती यशस्वी ठरली होती. या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून 200 ते 300 किलोग्रॅमपर्यंत युद्धसामग्री घेऊन जाता येणार आहे. 1 हजार किलोमीटरपर्यंतच्या शत्रूंच्या ठिकाणांना हे क्षेपणास्त्र उद्ध्वस्त करू शकते. टू स्टेज या क्षेपणास्त्राची लांबी सहा मीटरपर्यंत आहे. या क्षेपणास्त्राचे पंख 2.7 मीटरपर्यंत पसरतात.
  
उच्च दर्जाच्या नेव्हिगेशन सिस्टीमनं सज्ज
आण्विक क्षमतेनं सुसज्ज असलेल्या या क्षेपणास्त्रामध्ये लक्ष्य अचूक भेदण्यासाठी उच्च दर्जाचं नेव्हिगेशन सिस्टीम बसवण्यात आली आहे. ही नेव्हिगेशन सिस्टीम रिसर्च इमारती(आरसीआय)च्या माध्यमातून विकसित करण्यात आली आहे. संरक्षण वैज्ञानिकांना आशा आहे की, हे क्षेपणास्त्र ब्रह्मोसची जागा भरून काढेल. क्षेपणास्त्रामध्ये रॉकेट मोटर बूस्टर लावण्यात आलं असून, उंचावर गेल्यानंतर बूस्टर मोटर वेगळा होतो. या क्षेपणास्त्राची गती रॉकेटनुसार आहे. डीआरडीओच्या संशोधकांच्या माहितीनुसार, प्रक्षेपण झाल्यानंतर क्षेपणास्त्रामधील रॉकेट मोटर बंद होते आणि पंख बाहेर येतात. या क्षेपणास्त्रात अत्याधुनिक संगणकीय प्रणाली बसवण्यात आली आहे. उड्डाणाच्या दरम्यान संगणकाच्या कमांडनुसार क्षेपणास्त्राचे पंख खुलतात. 

Web Title: India test-fired missile test, destroying thousands of kilometers of enemy space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.