शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

काश्मीरबाबत संयुक्त राष्ट्रानं जारी केलेला अहवाल भारतानं फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2018 16:43 IST

संयुक्त राष्ट्रानं जम्मू-काश्मीरमधील कथित मानवाधिकारांच्या उल्लंघनावर पहिल्यांदाच अहवाल जारी केला आहे. ज्यावर भारतानं आक्षेप नोंदवला आहे.

नवी दिल्ली- संयुक्त राष्ट्रानं जम्मू-काश्मीरमधील कथित मानवाधिकारांच्या उल्लंघनावर पहिल्यांदाच अहवाल जारी केला आहे. ज्यावर भारतानं आक्षेप नोंदवला आहे. विशेष म्हणजे यात पाकव्याप्त काश्मीरचाही उल्लेख आहे. संयुक्त राष्ट्रानं कथित मानवाधिकारांच्या उल्लंघनाच्या मुद्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर चौकशीची मागणी केली आहे.संयुक्त राष्ट्रानं काश्मीरसंदर्भात दिलेला अहवाल चुकीचा आणि पक्षपाती असल्याचं भारतानं म्हटलं आहे. तसेच संयुक्त राष्ट्रानं एक प्रकारे आमच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेवर हल्ला केल्याचा आरोपही भारतानं केला आहे. संयुक्त राष्ट्रानं मानवाधिकार आयोगाचा अहवाल देत पाकिस्तानमध्येही दहशतवादविरोधी कायद्याच्या माध्यमातून सामान्यांना त्रास दिला जात असल्याचंही म्हटलं आहे. काश्मीरमध्ये मानवाधिकारांच्या होत असलेल्या उल्लंघनावर योग्य तोडगा काढण्यावरही अहवालात जोर दिला आहे.या अहवालावर भारतीय अधिका-यांनी आक्षेप नोंदवला आहे. जम्मू-काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरची कोणत्याही प्रकारे तुलना होऊ शकत नाही. जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाहीवर निवडून आलेलं सरकार आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोणालाही मनमानी पद्धतीनं नियुक्त केलं जातं. या अहवालात हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बु-हान वाणीला भारतीय सुरक्षा जवानांनी ठार केल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.  ज्याला घाटीतून खूप विरोध झाला, असंही त्या अधिका-यानं म्हटलं आहे. तसेच काश्मीरमध्ये नागरिकांचं अपहरण, हत्या आणि हिसेंसारख्या प्रकारांच्या माध्यमातून मानवाधिकारांचं उल्लंघन सुरू असल्याचंही या अहवालातून स्पष्ट करण्यात आलं आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारतPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवादunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ