भारत पाकिस्तानशी चर्चेसाठी तयार! संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची ही अट शाहबाज सरकारला पूर्ण करावी लागणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 22:30 IST2024-09-09T22:28:01+5:302024-09-09T22:30:43+5:30
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, शेजारी देशांशी संबंध सुधारण्याची इच्छा कोणाला नाही? जर पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद थांबवला तर भारत त्यांच्याशी चर्चेसाठी तयार आहे.

भारत पाकिस्तानशी चर्चेसाठी तयार! संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची ही अट शाहबाज सरकारला पूर्ण करावी लागणार
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली. राजकीय पक्षांनी तयारी केली आहे. दरम्यान, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी म्हणाले, काही लोक पाकिस्तानसोबत चर्चेबाबत बोलतात. जर पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद थांबवला तर भारत त्यांच्याशी चर्चा करण्यास तयार आहे.
बनिहाल विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवाराच्या समर्थनार्थ निवडणूक रॅलीला संबोधित करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणे बंद केले पाहिजे. शेजारी देशांशी संबंध सुधारण्याची इच्छा कोणाला नसेल? कारण मला वास्तव माहीत आहे की तुम्ही तुमचा मित्र बदलू शकता, पण शेजारी नाही.
राजनाथसिंह म्हणाले की, आम्हाला पाकिस्तानशी चांगले संबंध हवे आहेत, पण आधी त्यांना दहशतवाद थांबवावा लागेल. जेव्हा पाकिस्तान जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाला पुरस्कृत करणे थांबवेल तेव्हा भारत त्यांच्याशी चर्चा सुरू करेल, असंही सिंह म्हणाले.
संरक्षण मंत्री जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. राजनाथ सिंह म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाला बळी पडलेल्यांपैकी ८५ टक्के मुस्लिम आहेत. काश्मीरमध्ये दहशतवादी घटना सामान्य होत्या. दहशतवादी घटनांमध्ये हिंदू मारले जात होते का? मी गृहमंत्री झालो आहे आणि मला माहीत आहे की, दहशतवादी घटनांमध्ये मुस्लिमांनी सर्वाधिक जीव गमावला.