शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निधन; ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
‘बिनविरोध’च्या तक्रारीत तथ्य आढळल्यास नव्याने निवडणूक?; ६९ प्रकरणांची चौकशी, ‘नोटा’चे काय?
3
इराणमध्ये पेटला जनक्षोभ! आंदोलकांवर लष्करी कारवाई, ३५ जणांचा मृत्यू तर १२०० हून अधिक जण अटकेत
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, ६ जानेवारी २०२६ : आजचा दिवस आनंदाचा! आर्थिक लाभ संभवतात
5
ही संवेदनशीलता इतरांना कधी...? कार्यकर्त्यांसाठी मनाची घालमेल अन् अमित ठाकरेंचे वेगळेपण
6
‘बिनविरोध’वर गंडांतर; चेंडू आता हायकोर्टात, मनसेने दाखल केली याचिका, चौकशी करण्याची मागणी
7
काँग्रेसने ७० वर्षे शहरी विकासाकडे दुर्लक्ष केल्यानेच दुर्दशा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 
8
शरद पवार पक्ष पुढे नेणार, की पुतण्यासोबत जाणार? मनपा निवडणुकीनंतर आगे आगे देखो होता है क्या!
9
ठाणे पालिकेवर महायुतीचाच भगवा फडकणार, ११० उमेदवार निवडून येतील: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
10
आम्ही काय केले? विचारणाऱ्यांनी आरसा पाहायला हवा; नाव न घेता अजितदादांना फडणवीसांचा सूचक इशारा
11
भाजपवर टीका नाही, पालिका अन् तेथील स्थानिक प्रश्नांबद्दल बोललो; अजित पवारांचे स्पष्टीकरण
12
‘मायावी’ महामुंबईसाठी राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यांचे ‘जाळे’; भाजप-शिंदेसेनेचा जाहीरनामा कधी?
13
सत्ता अबाधित ठेवायला पक्ष, घर फोडत आहेत, आमच्या कामांचे श्रेय तुम्ही का घेता?: उद्धव ठाकरे
14
सत्ताधाऱ्यांच्या काळात ठाणे शहराची ओळख बदलली; संजय राऊतांची महायुतीवर टीका
15
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मनमानीला अखेर चाप; निवडणुकीला स्थगिती, हायकोर्टाचे ताशेरे
16
उमर खालीद, शरजिल इमामला दिलासा नाहीच, सुप्रीम कोर्टाने जामीन फेटाळाला; अन्य ५ जणांना जामीन
17
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या घरावर हल्ला; एकाला अटक, हेतूची चौकशी सुरू
18
ऐन निवडणुकीत मनसेला मुंबईत मोठा धक्का; माजी नगरसेवक संतोष धुरी भाजपाच्या वाटेवर
19
Video: विलासरावांच्या आठवणी लातूर शहरातून पुसल्या जातील; रवींद्र चव्हाणांच्या विधानानं वाद
20
मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश; रक्ताने पत्र लिहून इच्छामरणाची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास भारत सज्ज- संरक्षणमंत्री राजनाथसिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 05:25 IST

अंदमान-निकोबार बेटाजवळच्या समुद्रात भारताच्या विशेष आर्थिक विभागामध्ये चीनच्या एका जहाजाने नुकतीच घुसखोरी केली होती.

नवी दिल्ली : भारत व चीनमध्ये सीमातंट्यासह आणखी काही मुद्यांवर मतभेद आहेत, तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेमुळे चीनचे जवान भारतीय हद्दीत आणि भारतीय सैनिक चीनच्या हद्दीत जाण्याचे प्रकार घडतात. ती प्रत्यक्ष घुसखोरी नसते. मात्र, भारताची सैन्यदले कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज आहेत. आपल्या देशाच्या सीमा अत्यंत सुरक्षित आहेत, असे संरक्षणमंंत्री राजनाथसिंह यांनी बुधवारी लोकसभेत सांगितले.अंदमान-निकोबार बेटाजवळच्या समुद्रात भारताच्या विशेष आर्थिक विभागामध्ये चीनच्या एका जहाजाने नुकतीच घुसखोरी केली होती. सतर्क असलेल्या भारतीय नौदलाने या जहाजाला पिटाळून लावले. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधिररंजन चौधरी यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला राजनाथसिंह उत्तर देत होते. ते म्हणाले, सीमेच्या अगदी जवळच्या भागात चिनी लष्कराप्रमाणेच भारतीय सैन्यातले जवानही गस्त घालत असतात. डोकलाम येथे चीनने वाहनयोग्य रस्ता बांधायला घेतल्यानंतर त्याला भारतीय सैनिकांनी जून २०१७ मध्ये जोरदार आक्षेप घेतला होता.मोठा भूभाग बळकावला१९६७ साली सिक्कीमच्या नथू ला खिंडीत घडलेली चकमक वगळता भारत व चीनने त्यानंतर परिस्थिती फार चिघळणार नाही याची वेळोवेळी काळजी घेतली आहे. चीन अधूनमधून कुरापती काढत असतो.भारताला शत्रू मानणाºया पाकिस्तानला आर्थिक मदत करून चीनने त्यालाही वश करून घेतले आहे.राजनाथसिंह म्हणाले की, भारत व चीन आपसातील मतभेद चर्चेच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न करतील. १९६२ साली चीनने भारताचा मोठा भूभाग बळकावला आहे याचीही आठवण त्यांनी करून दिली.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंह