एफडीआय मिळण्यात भारत जगात पाचव्या स्थानावर; गतवर्षी मिळाले ६४ अब्ज डॉलर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 11:46 AM2021-06-24T11:46:47+5:302021-06-24T11:50:02+5:30

२०२० मध्ये एफडीआय ३५ टक्क्यांनी घटून १ लाख कोटी रुपयांवर आला.

India ranks fifth in the world in terms of FDI; Last year it received 64 billion pdc | एफडीआय मिळण्यात भारत जगात पाचव्या स्थानावर; गतवर्षी मिळाले ६४ अब्ज डॉलर

एफडीआय मिळण्यात भारत जगात पाचव्या स्थानावर; गतवर्षी मिळाले ६४ अब्ज डॉलर

googlenewsNext

नवी दिल्ली : २०२० मध्ये भारताला ६४ अब्ज डॉलरची थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) मिळाली. एफडीआय लाभार्थींच्या यादीत भारत पाचव्या स्थानी राहिला.  संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार व विकास परिषदेने (यूएनसीटीएडी) जारी केलेल्या ‘जागतिक गुंतवणूक अहवाल २०२१’मध्ये ही माहिती देण्यात आली आहे. अहवालानुसार, जागतिक एफडीआय प्रवाहास कोविड-१९ साथीचा जबर फटका बसला आहे.

२०२० मध्ये एफडीआय ३५ टक्क्यांनी घटून १ लाख कोटी रुपयांवर आला. आदल्या वर्षी तो १.५ लाख कोटी रुपये होता. कोविड-१९ लॉकडाऊनमुळे सध्याचे गुंतवणूक प्रकल्प धीमे झाले आहेत. तसेच नवीन प्रकल्प रखडले आहेत. अहवालात म्हटले आहे की, २०२० मध्ये भारताच्या एफडीआयमध्ये २७ टक्क्यांची वाढ झाली आहे. २०१९ मध्ये ५१ अब्ज डॉलरवर असलेला भारताचा एफडीआय २०२० मध्ये ६४ अब्ज डॉलरवर गेला. 

एफडीआय प्राप्त करणाऱ्या देशांत भारताचा पाचवा क्रमांक लागला. अहवालात म्हटले आहे. कोविड-१९ साथीमुळे डिजिटल पायाभूत क्षेत्र तसेच जागतिक सेवा क्षेत्र यांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आयसीटी उद्योगातील एफडीआय प्रकल्प २२ टक्क्यांनी वाढून ८१ अब्ज डॉलरवर गेले.

Web Title: India ranks fifth in the world in terms of FDI; Last year it received 64 billion pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.