शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक समानतेत भारत जगात १३५ व्या स्थानी, आईसलँड सर्वाधिक समतावादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 10:52 IST

मागील वर्षातील आर्थिक भागीदारी व संधींच्या क्षेत्रांमध्ये भारताच पाच क्रमांकाने बढती झाली आहे.

नवी दिल्ली : भारत लैंगिक समानतेत जगामध्ये १३५ व्या स्थानावर आहे. तथापि, मागील वर्षातील आर्थिक भागीदारी व संधींच्या क्षेत्रांमध्ये भारताच पाच क्रमांकाने बढती झाली आहे, असे जागतिक आर्थिक मंचने (डब्लूईएफ) जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे.  डब्ल्यूईएफच्या जिनेव्हामध्ये सुरू असलेल्या वार्षिक लैंगिक समानता अहवाल २०२२ नुसार, आईसलँड जगात सर्वाधिक समतावादी देशाच्या रूपाने प्रथम क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ फिनलँड, नॉर्वे, न्यूझीलंड व स्वीडनचा क्रमांक लागतो.

भारतातील लैंगिक समानतेचा क्रमांक मागील १६ वर्षांत सातव्या सर्वोच्च स्तरावर पोहोचला आहे. परंतु विविध मापदंडांवरील सर्वाधिक खराब कामगिरी करणाऱ्या देशांत समाविष्ट आहे, असे अहवालात म्हटले आहे. मागीलवर्षी भारताने आर्थिक भागीदारी व संधी यावरील कामगिरीत सर्वाधिक महत्त्वपूर्ण व सकारात्मक बदल केले आहेत. परंतु पुरुष व महिलांची श्रम दल भागीदारी २०२१ पासून कमी झाली आहे.  

भारतानंतर केवळ ११ देश एकूण १४६ देशांच्या यादीत भारताच्या नंतर केवळ ११ देशच आहेत. अफगाणिस्तान, पाकिस्तान, कांगो, इराण व चाड यांचा या यादीत सर्वात शेवटच्या पाच देशांमध्ये समावेश आहे. कोरोनाने लैंगिक समानतेला एक पिढी मागे ढकलले आहे व यातून सावरण्याच्या कमजोर प्रयत्नामुळे जागतिक स्तरावर प्रभाव पडत आहे, असेही अहवालात म्हटले आहे.

कमाईत वाढमहिला खासदार/आमदार, वरिष्ठ अधिकारी व व्यवस्थापकांची भागीदारी १४.६%नी वाढून १७.६% झाली. तांत्रिक श्रमिकांच्या रूपातील महिलांची भागीदारी २९.२% वाढून ३२.९% झाली. कमाईबाबत लैंगिक समानतेमध्ये सुधारणा झाली असली, तरी पुरुष व महिलांसाठीच्या मूल्यात कमी झाली आहे. 

अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरीमागील ५० वर्षांत राष्ट्रप्रमुखांच्या रूपात महिलांची भागीदारीच्या वर्षांमध्ये घट झाल्यामुळे राजकीय सशक्तीकरणाच्या उपनिर्देशांकात घट झाली. तथापि, भारत यात ४८ व्या स्थानावर आहे व अपेक्षेपेक्षा ही चांगली कामगिरी समजली जाते.

टॅग्स :Indiaभारत