शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

ड्रॅगनच्या दुखऱ्या जखमेवर बोट; भारतीय लष्कर चीनला धक्का देण्याच्या तयारीत

By कुणाल गवाणकर | Published: January 28, 2021 12:46 PM

भारतीय लष्कराचे अधिकारी तिबेटचा अभ्यास करणार; प्रस्ताव तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात

नवी दिल्ली: गेल्या आठ महिन्यांपासून भारत आणि चीनचं सैन्य पूर्व लडाखमध्ये आमनेसामने उभं ठाकलं आहे. काही दिवसांपूर्वीच चीननं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आगळीक करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय जवानांनी चिनी सैनिकांचा प्रयत्न हाणून पाडला. यानंतर आता चीनकडून सुरू असलेला अपप्रचार हाणून पाडण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज झालं आहे. यासाठी भारतीय लष्करानं तिबेटचा इतिहास, तिथली संस्कृती आणि भाषा जाणून घेण्याची रणनीती तयार केली आहे.चीनचा घुसखोरीचा डाव भारताने उधळला; २० चिनी सैनिक जखमी, परिस्थिती नियंत्रणातप्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या दोन्ही बाजूला असलेल्या तिबेटचा खोलात जाऊन अभ्यास करण्याच्या सूचना लष्करी अधिकाऱ्यांना दिल्या जाणार आहेत. याबद्दलच्या प्रस्तावाला अंतिम स्वरूप देण्याचं काम लष्कराकडून सुरू आहे. तिबेटचा अभ्यास करण्याचा प्रस्ताव सर्वप्रथम ऑक्टोबरमध्ये लष्कराच्या कमांडर्सच्या संमेलनात पुढे आला. आता लष्करप्रमुख मनोज नरवणेंच्या आदेशावरून शिमल्यातील आर्मी ट्रेनिंग कमांड (एआरटीआरएसी) प्रस्तावाच्या विश्लेषणावर काम करत आहे.भारताविरोधात आता चीनच्या पाण्याखालून कुरघोड्या; समोर आला महत्त्वाचा पुरावाएआरटीआरएसीनं तिबेटॉलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण देणाऱ्या सात संस्थांची माहिती मिळवली आहे. या ठिकाणी लष्करी अधिकाऱ्यांना शिक्षणासाठी पाठवलं जाऊ शकतं. एआरटीआरएसीनं निवड केलेल्या संस्थांमध्ये दिल्ली विद्यापीठाचा बौद्ध अध्ययन विभाग, वाराणसीतील सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर हायर तिबेटियन स्टडीज, बिहारमधील नवीन नालंदा महाविहार, पश्चिम बंगालमधील विश्व भारती, बंगळुरुस्थित दलाई लामा इन्स्टिट्यूट फॉर हायर एज्युकेशन, गंगटोकमधील नामग्याल इन्स्टिट्यूट ऑफ तिबेटॉलॉजी आणि अरुणाचल प्रदेशमधील दाहुंगस्थित सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन कल्चर स्टडीजचा समावेश आहे.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावladakhलडाख