ज्या शस्त्राने पाकिस्तानचे नाकी नऊ आणली, भारतीय सैन्याला मिळणार त्याचे अपग्रेडेड व्हर्जन...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 10:57 IST2025-05-27T10:56:58+5:302025-05-27T10:57:54+5:30
India Pinaka MK3: भारतीय सैन्याला अधिक प्रगत आणि विनाशकारी रॉकेट लॉन्चर मिळणार आहे.

ज्या शस्त्राने पाकिस्तानचे नाकी नऊ आणली, भारतीय सैन्याला मिळणार त्याचे अपग्रेडेड व्हर्जन...
India Pinaka MK3:पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने 'ऑपरेशन सिंदूर'द्वारेपाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. त्यानंतर पाकिस्तानने भारतातील अनेक शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला. पाकच्या प्रत्येक हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारताकडे एकापेक्षा एक धोकादायक शस्त्रे आहेत. आता सैन्याला आणखी एक घातक शस्त्र मिळणार आहे. डीआरडीओ लवकरच पिनाका एमके 3 ची चाचणी घेणार आहे. हे एक मल्टीबॅरल रॉकेट लॉन्चर आहे.
पिनाका अपग्रेड केला जात आहे. भारतात सध्या पिनाकाचे जुने व्हर्जन उपलब्ध आहे. यानेच पाकिस्तानविरुद्ध महत्त्वाची भूमिका बजावली होती. पिनाका एमके 1 ची रेंज 40 किलोमीटर आणि एमके 2 ची 60-90 किलोमीटर आहे.
पिनाका एमके 3 अधिक घातक का असेल?
पिनाका एमके 3 ची चाचणी लवकरच घेतली जाईल. त्याची रेंज 120 किलोमीटरपर्यंत असेल. त्यात 250 किलो वजनाचे वॉरहेड असेल. डीआरडीओ टीम त्यात नेव्हिगेशन आणि कंट्रोल किट बसवेल. हे लेसर गायरो नेव्हिगेशन आणि मायक्रोस्ट्रिप अँटेनाने सुसज्ज असेल. पिनाका अवघ्या 44 सेकंदात 12 रॉकेट सोडण्यास सक्षम आहे. भविष्यात डीआरडीओ 200 ते 300 किलोमीटरच्या रेंजसह पिनाकाची चाचणी देखील करेल.
चीन आणि पाकिस्तानचे टेंशन वाढणार
पिनाका एमके 3 ची रेंज बरीच जास्त आहे. त्यामुळे, पाकिस्तान आणि चीनसारख्या शेजारील देशांसाठी हा एक धोक्याचा इशारा असेल.
भारताकडे अनेक घातक शस्त्रे
भारताकडे अनेक घातक क्षेपणास्त्रे आहेत. यामध्ये अग्नि 5 आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. ब्रह्मोसची मारा क्षमता सुमारे 600 किलोमीटर आहे, तर वेग ताशी 3700 किलोमीटर आहे. अग्नि 5 बद्दल बोलायचे झाले तर त्याची रेंज 5000 ते 8000 किलोमीटर आहे. यात मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल (MIRV) तंत्रज्ञान देखील आहे.